Tarun Bharat

गोवा-बेळगाव चोर्ला महामार्गावर पावसाळय़ात यंत्रणा सज्ज

Advertisements

खास एजन्सीची नियुक्ती. पावसाळय़ात वाहने चालविताना सावधगिरी गरजेची : आत्माराम गावडे

उदय सावंत/चोर्ला

गोवा-बेळगाव भागाला जोडणारा चोर्ला घाट महामार्गाला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिलेला आहे. या पावसाळी मोसमात संभाव्य दरडी कोसळण्यासंबंधी पुर्ण  खबरदारी घेतलेली आहे. यासाठी एक खास एजन्सीची नियुक्ती केली असून पावसाळी मोसमात या महामार्गावर प्रवास करणाऱया प्रवाशांना त्रास होणार नाही याची विशेष दखल घेण्यात येणार असल्याचे माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता आत्माराम गावडे यांनी दिली.

  सध्या पावसाळा जवळपास सुरू झाला असला तरीसुद्धा गटार सुरळीत करण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आलेली आहे. यामुळे गटारातील पाणी महामार्गावरून वाहणार नाही याची विशेष दखल घेण्यात येणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

  गोवा बेळगाव दरम्यान जोडणारा चोर्ला महामार्ग हा प्रवासी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. खासकरून पावसाळी मोसमात या रस्त्यावर सातत्याने अडथळे निर्माण होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे वारंवार वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत असतात. यापूर्वी हा महामार्ग वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यंत्रणेनेकडे होता. या महामार्गाचा ताबा सध्यातरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग विभागाकडे देण्यात आलेला आहे. यामुळे आता याचे व्यवस्थापन पूर्णपणे या विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे, असे कार्यकारी अभियंता आत्माराम गावडे यांनी सांगितले.

  यंदाच्या पावसात दरडी कोसळण्याचे प्रकार घडल्यास त्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. शक्मय तेवढय़ा लवकर कोसळणाऱया दरडी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी एका खास एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून या मार्फत सर्व प्रकारची मशिनरी कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे आत्माराम गावडे यांनी स्पष्ट केले आहे.

अवघ्याच महिन्यापूर्वी ताबा घेतला

दरम्यान याचा ताबा अवघ्याच महिन्यापूर्वी घेतलेला आहे. यामुळे चांगल्या प्रकारची यंत्रणा सज्ज करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. मात्र यंदाच्या पावसाळय़ात कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना अडथळा निर्माण होणार नाही याची विशेष दखल घेण्यात येणार आहे. सध्यातरी साखळी ते गोवा कर्नाटक दरम्यानच्या गोवा हद्दीपर्यंत हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आलेले आहे. सदर डांबरीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे . पावसाळी मोसमात नंतर दुसऱया टप्प्याला सुरुवात करण्यात येणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.

  पावसाळी मोसमानंतर या रस्त्याचे व्यवस्थापन अत्यंत प्रभावीपणे करण्यासाठी या विभागाची यंत्रणा चांगल्या प्रकारे कार्य करणार आहे. पावसाळी मोसमात दरडी कोसळण्याच्या प्रकारांना नियंत्रण यावे यासाठी वेगवेगळय़ा ठिकाणी संरक्षण भिंतीची उभारणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

गटार दुरुस्ती कामाला सुरुवात.

दरम्यान सदर महामार्गावरील दुतर्फा असलेली गटार व्यवस्था पूर्णपणे बुझलेली आहे. यामुळे गटारातील पाणी पूर्णपणे रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रस्ता खराब होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. गटार दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आलेली असून काम युद्धपातळीवर सुरू आहे .पावसाचे पाणी कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरून वाहणार नाही याची विशेष दखल घेण्यात येत आहे, असे गावडे यांनी स्पष्ट केले आहे.

पावसाळय़ात वाहने जपून चालविणे गरजेचे.

दरम्यान सदर महामार्गावर पावसाळी मोसमात वाहने जपून चालविणे अत्यंत गरजेचे आहे. गेल्या आठ दिवसापासून काही प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे रस्त्याच्या बाजूची जमीन पूर्णपणे ओलसर झाली असून गेल्या दोन दिवसापासून केरी ते चोर्ला गोवा हद्दीपर्यंत काही वाहनांना अपघात झालेला आहे. पावसाळय़ात या महामार्गावरून वाहने चालविताना मर्यादित गती राखणे, वळणावर सावधगिरीने वाहने चालविणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

बांदोडकर, पर्रीकर ही नावे केंद्राकडे पाठविणार

Amit Kulkarni

..तीन दिवसानंतर आज होणार फोंडा तालुक्याला पाणीपुरवठा – दिपक पाऊसकर

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी सरकार कटिबद्ध

Amit Kulkarni

वाघांची नखे गायब प्रकरणाची चौकशी

Patil_p

मडगावातील प्रसिद्ध विचार वेध व्याख्यानमाला 8 जानेवारीपासून

Patil_p

शांतादुर्गा किटलकरीण देवस्थानात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!