Tarun Bharat

गोवा-बेळगाव चोर्ला रस्त्याच्या बिकट अवस्थेबाबत वाळपई काँग्रेस आक्रमक

15 दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा.

वाळपई / प्रतिनिधी

गोवा बेळगाव दरम्यानच्या चोरला परिसरातील रस्त्यांची अक्षरशा वाईट परिस्थिती झालेली आहे. यामुळे सदर रस्त्यावरून वाहतूक करणे म्हणजे अत्यंत तारेवरची कसरत करावी लागत आहे. यारस्त्याचे टेंडरिंग झालेले आहे. मात्र अजून पर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही .सध्या दिवाळीचा सण असल्यामुळे सदर रस्त्यावरून वाहतुकीचे प्रमाण वाढण्याची शक्मयता असल्याने प्रवाशांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे गोवा सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने पंधरा दिवसात सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा वाळपई काँग्रेस समितीने दिला आहे. सदर रस्त्याच्या बिकट अवस्थेत संदर्भात वाळपई काँग्रेस समिती आक्रमक झाली असून त्यांनी या संदर्भात निवेदनाद्वारे वाळपई रस्ता विभागाचे सहाय्यक अभियंता देवेंद्र वेंलिंगकर यांना सादर करून यासंदर्भात इशारा दिलेला आहे.

सरकार सदर रस्त्याच्या बाबतीत अत्यंत असंवेदनशील असून यामुळे गेल्या अनेक दिवसापासून रस्त्याची बिकट अवस्था झाली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

दरम्यान सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू होणार असून संबंधित कॉन्ट्रक्टरने यासंदर्भाची पुर्वतयारी केल्याचे सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलिंगकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

रस्त्याची अक्षरशः चाळण.

गोवा कर्नाटक या दोन्ही राज्यांना जोडणारा चोरला महामार्ग हा नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मात्र पावसाळय़ात यारस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून यामुळे रस्त्याची चाळण झालेली आहे ..यामुळे सदर रस्त्यावर वाहतूक करणे म्हणजे अत्यंत डोकेदुखी ठरत आहे .यारस्त्याची दुरुस्ती ताबडतोब हाती घ्यावी अशा प्रकारची मागणी नागरिकांनी करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे अशा प्रकारचा आरोप करीत आज वाळपई  काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱयाने सहाय्यक अभियंता यांची भेट घेऊन यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेतला .यावेळी समितीचे अध्यक्ष दशरथ मांदेकर महिला समितीचे अध्यक्ष रोशन देसाई सरचिटणीस नंदकुमार कोपर्डेकर उपाध्यक्ष सुरेश कोंदाळकर मोहम्मद खान कृष्णा नेने व इतरांची खास उपस्थिती होती. यावेळी त्यांनी  अभियंता देवेंद्र वेलिंगकर यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करून रस्त्याच्या दुर्लक्षितपणा संदर्भात तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला.

15 दिवसांची मुदत अन्यथा रास्ता रोको

यासंदर्भात काँग्रेस समितीने सरकारला पंधरा दिवसांची मुदत दिलेली आहे. पंधरा दिवसात या रस्त्याचे दुरुस्ती करणे व डांबरीकरण सुरू करावे अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे .ज्या कॉन्ट्रक्टरने या रस्त्याचे काम हाती घेतलेले आहे ते याकामी चालढकलपणा करीत असून यामुळे नागरिकांचे जीव धोक्मयात जाण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे .त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने यासंदर्भात निष्काळजीपणा न करता हा प्रश्न गांभीर्याने हाती घ्यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री कमीशन घेतो.

यावेळी पत्रकारांशी बोलताना दशरथ मांदेकर व रोशन देसाई यांनी सार्वजनिक मंत्री दीपक पावसकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला जात नसल्यामुळे रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. यामुळे येणाऱया काळात रस्त्याची दुरुस्ती व नव्याने डांबरीकरण हे दर्जात्मक स्वरूपाचे करावे अन्यथा सदर रस्त्याची पुन्हा एकदा वाईट परिस्थिती होणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

शुक्रवार पासून कामाला सुरुवात करणार.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम  सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलिंगकर यांनी त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शुक्रवारपासून या कामाच्या दुरुस्तीला प्रारंभ होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याची दुरुस्ती ताबडतोब सुरू करावी अशा प्रकारची अनेक पत्रे कॉन्टॅक्टरला पाठविण्यात आलेली आहेत. मात्र काही अडचणींमुळे याकामाला प्रारंभ होऊ शकलेला नाही. तरीसुद्धा शुक्रवारपासून या रस्त्याच्या दुरुस्तीला प्रारंभ करणार असल्याचे कॉन्ट्रक्टरने सांगितल्याचे यावेळी देवेंद्र वेलिंगकर यांनी  स्पष्ट केले  आहे. सुमारे 9 कोटी 27 लाख खर्चून संपूर्ण 17 किलोमीटर रस्त्याचे पुन्हा हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या रस्त्याच्या खड्डय़ांची दुरुस्ती हाती घेण्यात येणार असून त्यानंतर डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱयानी स्पष्ट केलेले आहे.

2013-14 साली झाले होते डांबरीकरण.

दरम्यान या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार सदर रस्त्याचे 2013 14 साली 8 कोटी खर्च करुन डांबरीकरण करण्यात आले होते. हा रस्ता पूर्णपणे घाट परिसरातून जात असल्यामुळे रस्त्याच्या बाजूच्या कडा कोसळून गटारे मातीने भरत असतात व पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहत असतो .यामुळे रस्त्यावरील डांबरीकरणाला हानी पोहोचत असून यामुळे रस्त्याच्या  अनेक ठिकाणी खड्डे पडत असल्याचे समजते. मात्र 2013 14 साली 8 कोटी खर्च करून सुद्धा या रस्त्याच्या वाईट अवस्थेबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Related Stories

आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Archana Banage

माजी मंत्री मिकी पाशेकोविरुद्धची सुनावणी तहकूब

Omkar B

कोरोना संक्रमण काळात नवीन भाडेकरु ठेऊ नयेत

tarunbharat

साहित्य व्यापकरित्या पोहोचविण्यासाठी प्रयत्न आवश्यक

Amit Kulkarni

सभापतींना सरकारचा कर्मचारी समजू नका

Amit Kulkarni

वादळी पावसामुळे घरे, शेती, बागायतींचे नुकसान

Amit Kulkarni