Tarun Bharat

गोवा राज्य संग्रहालयातर्फे ‘राष्ट्रीय संग्रहालय आठवडा’ निमित्त विविध कार्यक्रम

नवरात्री महोत्सवाचे छाया प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधते

प्रतिनिधी/ पणजी

गोवा राज्य संग्रहालयातर्फे दि. 6 ते 10 जानेवारी 2020 दरम्यान ‘राष्ट्रीय संग्रहालय आठवडा 2020’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने पणजीतील अदिल शहा पॅलेस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहीती गोवा राज्य संग्रहालयाची संचालक राधे भावे यांनी दिली.

  या कार्यक्रमाअंतर्गत गोमंतकीय प्राचिन मंदिरांमध्ये अनेकोवर्षे होत असलेल्या नवरात्री महोत्सवाचे दर्शन छायाप्रदर्शनाच्या माध्यामातून भरविण्यात आले आहे. तसेच मखरोत्सवाबद्दलची माहीती व सामग्री येथे प्रदर्शनाला ठेवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने रामनाथी बांदोडा येथील रामनाथ मंदिर, नागेशी येथील नागेश मंदिर, कवळे येथील शांतादुर्गा मंदिर, बांदोडा येथील महालक्ष्मी मंदिर, म्हार्दोळ-प्रियोळ येथील म्हालसा नारायणी मंदिर, व मंगेशी येथील मंगेश मंदिराचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सुमारे 100 वर्षापेक्षा जास्त जुना असलेला मंदिराचा मखर देखील या प्रदर्शनामध्ये लोकांना पाहायला मिळत आहे, असे भावे यांनी पुढे सांगितले.

  या प्रदर्शनासोबत इतर कार्यक्रम देखील आयोजित केले आहे. बुधवारी दि. 8 रोजी(काल) ‘फुलती फुला’ हा कवितेचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये कवि व लेखकांनी आपली कविता व मते मांडली. याआधी सुभाष जाण यांनी मखरोत्सव विषयी माहीती दिली. तर शुक्रवारी दि. 10 रोजी शालेय मुलांसाठी खास ‘पेंटींग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. असेही राधा भावे यांनी अधिक माहीती देताना सांगितले.

  या राष्ट्रीय संग्रहालय आठवडय़ानिमित्त या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व गोमंतकीयांनी मुद्दामहून या कार्यक्रमाला भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहनही संचालिका राधा भावे यांनी यावेळी केले.

Related Stories

आम्हाला सरकारने विश्वासात घेतले असते तर आज हे कोविडचे दिवस आले नसते- दिगंबर कामत

Patil_p

भगतसिंग कोश्यारी राज्यपालपदी शपथबद्ध

Omkar B

भाजप सरकारने पेट्रोलचे दर त्वरीत कमी करावे : युरी आलेमाव

Amit Kulkarni

गोवा हे देशातील संसाधन कार्यक्षमता धोरण असलेले प्रथम राज्य

tarunbharat

शूटिंग स्पर्धेत युवराज, आदित्य, एल्ड्रिडा, साईनेश, अतुल, सिद्धार्थ, यश सुवर्णपदकांचे मानकरी

Amit Kulkarni

मोर्ले, चोरला भागामधील आगीचे तांडव नियंत्रणात

Omkar B