Tarun Bharat

गोवा : काँग्रेसकडून आलेक्स रेजिनाल्ड यांचा पत्ता कट

Advertisements

कुडतरित मोरेनो रेबेलो यांना उमेदवारी जाहीर

ऑनलाईन टीम / गोवा़

गोवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकिय पक्षांच्या घडामोडींना वेग आला असून जस जसे दिवस पुढे सरकतील तसे राजकिय पक्ष ही आपल्या हालचाली गतीमान करत आहेत. नुकतेचं काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानूसार अलेक्स रेजिनाल्ड यांचा पत्ता कट केला गेला आहे. तर त्यांच्या जागी मोरेनो रेबेलो Moreno Rebello यांना संधी दिली जाणार आहे.

काँग्रेस उमेदवारांची पाचवी यादी जाहीर झाली असून मायकल लोबो यांच्या पत्नी डिलायला लोबो यांना शिवोलीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. साळगावात केदार नाईक. कुडतरीत मोरेनो रिबेलो यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये परतण्याचा विचार करणाऱ्या आलेक्स रेजिनाल्ड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कुडतरी मतदारसंघातून तीनवेळा जिंकून आलेले रेजिनाल्ड यांनी मागच्या महिन्यात तृणमुल पक्षात प्रवेश केला होता. मात्र तृणमुल पक्षात सामील झाल्यानंतर त्यांची लोकप्रियता झपाट्याने उतरू लागली होती. याच पार्श्वभूमीवर त्यानी हा राजीनामा दिला आहे. ते पुन्हा काँग्रेस पक्षात परतले आहेत.

Related Stories

शेतकऱ्यांचे आज देशव्यापी आंदोलन

datta jadhav

सांगेतील राजकीय समीकरणांत वेगाने बदल

Omkar B

महाराष्ट्रात 10 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

डॉ. एडविन गोम्स ठरले देवदूत…

Omkar B

आले व्यापाऱयांनी बळीराजाची पिळवणूक थांबवावी

Patil_p

सालेली सत्तरी गावातील बेकायदेशीर दारु विक्री विरोधात रणरागिणी सरसावल्या

Omkar B
error: Content is protected !!