Tarun Bharat

गोवा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा स्थगीत

प्रतिनिधी / पणजी

गोवा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा, ज्या ऑफलाईन होणार होत्या त्या 16 जूनपर्यंत स्थगीत करण्यात आल्या असल्याचे गोवा विद्यापीठाने कळविले आहे. त्यानंतर परीक्षा घेण्यापूर्वी 15 दिवस अगोदर विद्यार्थ्यांना कळविण्यात येणार असल्याचे नोटीसीत म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे या परीक्षा स्थगीत करण्यात आल्या आहेत.

गोवा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांच्या ऑनलाईन परीक्षाही 8 जूनपर्यंत स्थगीत करण्यात आल्या आहेत. बीए, बीएससी, बीकॉम, बीबीए, पहिल्या व दुसऱया वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार होत्या. तसेच प्रोजेक्ट, शोध प्रबंध, सादर करण्यासाठी 1 जून 2021 ही अंतीम तारीख आहे, असेही कळविण्यात आले आहे.

Related Stories

ऍड. यतीश नाईक यांचा भाजपात प्रवेश

Amit Kulkarni

संघटितपणे कार्य केल्यास साखळी जिंकणे सोपे

Amit Kulkarni

आजपासून शनिवारपर्यंत दररोज पावसाची शक्यता

Amit Kulkarni

ओला, उबर टॅक्सींना गोवा टॅक्सी संघटनेचा विरोध

Amit Kulkarni

पार्सेत झाडे कोसळून वीज खात्याचे नुकसान

Amit Kulkarni

सोनसडा कचरा यार्डात पुन्हा आगीची घटना

Amit Kulkarni