Tarun Bharat

गोवा विधानसभा : काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

ऑनलाईन टीम / गोवा

गोव्यातील विधानसभेच्या पार्श्वभुमीवर इतर राजकिय पक्षांबरोबरच राष्ट्रीय काँग्रेसने ही कंबर कसली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण ९ उमेदवारांचा समावेश आहे.

गोव्यातील विधानसभेच्या पार्श्वभुमीवर साखळी विधानसभा मतदारसंघात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात उमेदवार कोण ? याकडे नागरीकांचे लक्ष लागले होते. ही प्रतिक्षा आता संपली आहे. कारण राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आणि साखळीचे माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी हे आहेत. या शिवाय अलिकडेच भाजपच्या मंत्री पदाचा राजीनामा देत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले मायकल लोबो यांना कळंगुट येथे उमेदवारी देण्यात आली आहे. तर सांगे मतदार संघातून अपक्ष माजी आमदार प्रसाद गावकर हे काँग्रेसचे उमेदवार म्हणुन निवडणूक लढवणार आहेत.

याबरोबर तृणमूल काँग्रेसमध्ये राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले लवू मामलेदार हे मडकई मतदार संघातून लढतील. याशिवाय काणकोणमध्ये जनार्दन भंडारी हे लढतील तर डीचोली मतदार संघात मेघश्याम राऊत हे लढणार आहेत. थिवीम मतदार संघातुन अमन लोटलीकर तर पर्वरीमध्ये विकासप्रभु देसाई आणि सांतआंद्रेमध्ये अन्थोनी फर्नांडीस हे काँग्रेसचे उमेदवार असतील असे राष्ट्रीय काँग्रेसने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीद्ववारे स्पष्ट केले आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष आपल्या उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत बद्दल जाणून घ्या कोण आहे रिंगणात ?

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या बाजूने मेघश्याम राऊत, अमन लोटलीकर, मिचेल लोबो, विकास प्रभूदेसाई, अँथोनी एल फर्नांडीसधर्मेश सगलानी, लावू मामलेकर, प्रसाद गावकर, जनार्धन भंडारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत जितेंद्र गावकर, लुई फर्नांडिस, मनीषा शेणवी उसगावकर, राजेश फळदेसाई, कॅप्टन विरातो फर्नांडिस, अवेर्तनो फुर्तादो आणि ओलेन्सियो सिमोस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी, या निवडणुकीत काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाशी हातमिळवणी केल्यामुळे अशा परिस्थितीत काँग्रेस उत्तर गोव्यातील मये आणि दक्षिण गोव्यातील फातोर्डा येथून उमेदवार उभा करणार नाही.

Related Stories

झोळंबेत खुल्या भजन स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Anuja Kudatarkar

आमच्या उत्पन्नाच्या जागेत आयआयटी नको

Patil_p

‘सोन्याच्या पावलांनी…मोत्याच्या पावलांनी’ आली गौराई

Patil_p

दिल्ली : कोरोनावर मात करुन पुन्हा कामावर हजर झाले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन

Tousif Mujawar

ममता एक्सप्रेस सुसाट ; अभिनेत्री श्रबंती चॅटर्जीचा भाजपला रामराम

Abhijeet Khandekar

रत्नागिरी : लांजा महामार्ग कामाला अखेर मुहूर्त!

Archana Banage