Tarun Bharat

गोवा विधानसभा : रिपब्लिकनचा काँग्रेसला पाठिंबा

Advertisements

गोवा / पणजी

विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीने काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. आनंद सुर्वे, प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर आदी यावेळी उपस्थित होते.

चोडणकर म्हणाले की, एआयआरपीचे मांद्रे, पेडणे, थिवी आणि हळदोण मतदारसंघात सक्रिय सदस्य आहेत. “त्यांचे इतर मतदारसंघातही समर्थक आहेत, जे काँग्रेसला जागा जिंकण्यास मदत करतील.” असे चोडणकर म्हणाले. गिरीश चोडणकर म्हणाले की, भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एक व्यासपीठावरून काम केले पाहिजे. “भाजपच्या राजवटीत लोकांना त्रास सहन करावा लागला म्हणून त्यांना घरी पाठवणे आवश्यक आहे. गोव्याच्या चांगल्या भविष्यासाठी भाजपला पराभूत करणे आवश्यक आहे.’’ असे चोडणकर म्हणाले.
भाजपचा पराभव करण्यासाठी ते काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे ज्ञानेश्वर म्हणाले. “काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि या पक्षाने नेहमीच गोव्यातील लोकांसाठी काम केले आहे. भाजपच्या राजवटीत जनता त्रस्त आहे. त्यामुळे भाजपला घरी पाठवण्याची गरज आहे.’’ असे ते म्हणाले.

अमरनाथ पणजीकर यावेळी बोलताना म्हणाले कि, बाबासाहेब आंबेडकर भवन गोव्यात प्रत्यक्षात आले पाहिजे, यासाठी त्यांनी काँग्रेसकडे मागणी केली असल्याचे ते म्हणाले.राव म्हणाले की, एआयआरपी सर्व मतदारसंघात काँग्रेससोबत काम करेल. “त्यांचा आवाज ऐकला जाईल आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करून त्या पूर्ण केल्या जातील. आम्ही समाजातील सर्व घटकांची काळजी घेऊ.

Related Stories

सिंधुदुर्ग सीमा खुला होण्याची प्रतीक्षा

NIKHIL_N

काल जे घडलं ते लाजिरवाणं होतं – मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

काणकोणात संततधार, सर्वत्र पूरसदृश परिस्थिती

Patil_p

वेस्ट बंगाल ओरीसाच्या नागरिकांना खास रेल्वेतून गावी पाठवून द्या- मंत्री मायकल लोबो यांची मागणी

Omkar B

एसटी धावतेय प्रवाशांविनाच

NIKHIL_N

नावशीतील मरिना प्रकल्प रद्द

Amit Kulkarni
error: Content is protected !!