Tarun Bharat

गोवा वेल्हात महिलांसाठी धावण्याची स्पर्धा

स्ट्राँग टाईल्स ऑफ तळावली संघाचा उपक्रम : 7 मार्च रोजी आयोजन

प्रतिनिधी / पणजी

स्ट्राँग टाईल्स ऑफ तळावली गोवा वेल्हा या संघटनेतर्फे आयोजित ’महिला रन 2021’ ही खास महिलांसाठी धावण्याची स्पर्धा येत्या दि. 7 मार्च रोजी होणार आहे.

संघटनेचे पदाधिकारी दामोदर वेर्लेकर आणि मंजुनाथ देसाई यांनी आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 15 वर्षांखालील, 15 ते 35 वर्षे आणि त्यावरील अशा तीन वयोगटात ही स्पर्धा होणार आहे. सांतान तळावली येथील शांतादुर्गा मंदिराकडून तळावली येथील सेंट ऍनिस चर्च पर्यंत जाऊन पुन्हा शांतादुर्गा मंदिरापर्यंत येणार आहे. हे संपूर्ण अंतर सुमारे पाच कि. मी. असेल. स्पर्धा सकाळी 6.30 वाजता प्रारंभ होणार असून सर्व स्पर्धकांनी सकाळी 6 पर्यंत उपस्थित राहावे, असे वेर्लेकर यांनी सांगितले. गतवर्षी प्रथमच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 220 महिलांनी त्यात भाग घेतला होता. यंदा त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्पर्धेत प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख, पदके व प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. 1 मार्चपर्यंत नावनोंदणी करता येणार असून इच्छूक महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वेर्लेकर यांनी केले.

Related Stories

आरोग्य खात्यात तीनशे कोटीचा घोटाळा

Patil_p

केपेतील साप्ताहिक बाजार आजपासून तात्पुरता बंद

tarunbharat

मुलांच्या शालेय साहित्यांची खरेदी करताय; ही काळजी घ्या…

Kalyani Amanagi

घरावर झाड कोसळल्याने रेवोडा येथे एक जखमी

Omkar B

शिवडे धारबांदोडय़ातील चोरटय़ा जलवाहिन्या तोडल्या

Omkar B

शिक्षणाच्या जोरावर मागासलेपणाचा डाग पुसून काढा

Amit Kulkarni