Tarun Bharat

गोवा शालान्त मंडळाच्या अध्यक्षपदी भगिरथ शेटय़े

पणजी / प्रतिनिधी              

 गोवा माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नवे चेअरमन म्हणून  शिक्षण उपसंचालक भगिरथ शेटय़े यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी तसा आदेश काल शुक्रवारी जारी केला आहे.

 शिक्षण उपसंचालकपदी असलेले शेटय़े सोमवारी गोवा बोर्डाच्या चेअरमनपदाचा ताबा घेणार आहेत. यापूर्वी गोवा बोर्डाचे सचिव म्हणून सक्षमपणे जबाबदारी पार पाडलेली आहे.

 नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आणण्याचे एक नवे आव्हान त्यांच्यासमोर आहे. कोविड महामारीतसुद्धा गोवा बोर्डाच्या 10 वी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि गोवा बोर्डाचे   चेअरमन रामकृष्ण सामंत यांच्या मार्गदर्शानाखाली त्यांनी लीलया पेलले होते.

 शेटय़े यांनी विज्ञान शाखेची गोवा विद्यापीठातून भौतिक व रसायन शास्त्रसारख्या अवघड विषयात त्याकाळी पदव्युत्तर पदवी मिळवताना गोवा विद्यापीठात या विषयात सुवर्ण पदक प्राप्त केले. लागलीच हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रेड वन टीचरची जागा मिळाली. त्याठिकाणी त्यांनी प्राचार्य पदापर्यंत मजल मारली. त्यानंतर गोवा लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून गोव्याच्या शिक्षण खात्यात सहाय्यक शिक्षण संचालकपदापर्यंत मजल मारली. पुढे म्हापसा येथे विभागीय शिक्षण उपसंचालक, गोवा बोर्डात सचिव आणि सध्या शिक्षण खात्याचे प्रशासकीय उपसंचालक ही विविध पदे त्यांनी भूषवली आहेत. धारगळ पेडणे येथील व्ही. डी. परब यांच्यानंतर पेडण्यातून या पदावर पोचणारे भगीरथ शेटये दुसरे अधिकारी आहेत.

Related Stories

गिरीश चोडणकर यांना पितृशोक

Amit Kulkarni

कर्मचारी कोरोनाबाधित आढळला काणकोण पालिका दोन दिवस बंद

Patil_p

कामुर्ली पीपल्स हायस्कूलमध्ये क्रांतिदिन

Amit Kulkarni

पद्मभूषण लक्ष्मण पै यांच्यावर मडगावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

स्वा.सै.गोपीनाथ मुळये निवर्तले

Amit Kulkarni

वीस कोटींची खंडणी मागणाऱयास अटक

Omkar B