Tarun Bharat

गोविंद उपउपांत्यपूर्व फेरीत, निशांत दुसऱया फेरीत

बेलग्रेड : एआयबीए पुरूषांच्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या गोविंद साहनीने उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. त्याचप्रमाणे निशांत देवने विजयी सलामी देत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.

पुरूषांच्या 71 किलो वजनगटातील पहिल्या फेरीच्या लढतीत निशांत देवने हंगेरीच्या कोझेकचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. आता देवचा दुसऱया फेरीतील सामना मॉरिशसच्या क्लेअरविरुद्ध होणार आहे. क्लेअरला या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुढेचाल देण्यात आली आहे. पुरूषांच्या 48 किलो वजनगटातील लढतीत गोविंद साहनीने इक्वेडोरच्या ओरिझवर 3-2 अशा गुणांनी विजय मिळवित शेवटच्या 16 स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले.

या स्पर्धेत प्रथमच प्रवेश मिळविणाऱया भारताच्या लक्ष चहरचे आव्हान सलामी फेरीत समाप्त झाले. 86 किलो वजनगटातील पहिल्या फेरीच्या लढतीत कोरियाच्या किमने चहरचा पराभव केला. भारताच्या सुमीतने 75 किलो गटात तर नरेंद्र बरवालने 92 किलोवरील गटात पहिल्या फेरीतील सामने जिंकले. सुमीतने जमैकांच्या ओनिलचा 5-0 तर नरेंद्रने पोलंडच्या सेफारियेनचा 4-1 असा पराभव केला.

Related Stories

भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय

Amit Kulkarni

चेन्नईला रोखण्याचे राजस्थान रॉयल्ससमोर आव्हान

Patil_p

भारतीय कनिष्ठ हॉकी संघाचे नेतृत्व उत्तम सिंगकडे

Amit Kulkarni

लियांडर पेसच्या वेबसाईटचे उद्घाटन नवी दिल्लीत

Patil_p

प्रणॉय, सिंधूवर भारताची भिस्त

Amit Kulkarni

मल्ल रवी दाहियाला रौप्यपदक

Amit Kulkarni
error: Content is protected !!