Tarun Bharat

गोव्याचे भीष्म पितामह न्यायवैधक डॉ. उसगावकार कालवश

प्रतिनिधी  /पणजी

गोव्यात व महाराष्ट्रात मिळून तब्बल पाच दशके प्रसिद्ध फॉरेन्सिक डॉक्टर म्हणून नावलौकीक मिळविले डॉ. मधुकर शेणवी उसगावकर यांचे सोमवारी रात्री राहत्या घरी निधन झाले. ते 83 वर्षाचे होते. गोमेकोत 1962 ते 1994 अशी 33 वर्षे तर कृष्णा इंस्टीटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स, कराड (महाराष्ट्रा) येथे फॉरेन्सिक विभाग प्रमुख या नात्याने तब्बल वीस वर्षे त्यांनी  सेवा दिली. दोन्हीकडे ते वैद्यकीय विद्यार्थ्यामध्ये शिक्षक म्हणून प्रचंड लोकप्रिय होते.

त्याच्या निधनावर गोमेकोचे माजी  फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. सिल्वनो सपेको यांनी दुख व्यक्त केले असून त्यांनी आपल्या शोक संदेशात,  डॉ. उसगावकार यांना पोलिस खात्यात  व न्यायालयातही मोठा मान मिळत होता असे म्हटले आहे.  गोव्यात त्याकाळी गाजलेल्या कित्येक खून, बलात्कार  प्रकरणात चिकित्सा करून न्यायालयात दिलेल्या साक्षीच दिली होती व त्यातील काही साक्षीचे  कौतूक टिपाणी न्यायमूर्तीनी आपल्या निकलपत्रात केले असल्याचीआठवण या वेळी त्यांनी करून दिली.

डॉ. मधुकर उजगावकर हे पोर्तुगीज काळातील असोलडा  येथील प्रसिद्ध डॉक्टर कै. शीवराम उसगावकार यांचे सुपुत्र आहे तर गोमेकोचे  नेत्रविभाग प्रमुख डॉ. उगम उसगावकार यांचे काका आहेत. त्यांच्या पश्च्यत पत्नी सौ. माणीक, पुत्र सुश्रुत, कन्या प्रतिभा, सून, जावई, नातवंडे, वडील बंधु बघिणी असा मोठा परिवार आहे.

Related Stories

गोंय स्वातंत्र्याचे होमखणचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Amit Kulkarni

मारेकऱयांना दहा दिवसांची पोलीस कोठडी

Patil_p

लोकायुक्तांचा आदेश हायकोर्टात रद्दबातल

Patil_p

जपानात होणाऱया शिक्षक प्रशिक्षणासाठी लता नाईक यांची निवड

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या

Amit Kulkarni

मडगाव श्री हरि मंदिराचा आषाढी एकादशी उत्सव

Amit Kulkarni