Tarun Bharat

गोव्याच्या जनतेशी संवाद साधूनच काँग्रेसचा जाहीरनामा

मडगावात 14 रोजी साधणार संवाद

प्रतिनिधी /मडगाव

गोव्यातील जनतेशी संवाद साधूनच काँग्रेस पक्ष यावेळी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. जनतेला काय हवे, काय नको, काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेच्या हितासाठी काय करावे हे लोकांकडून ऐकून घेतल्यानंतरच काँग्रेस पक्ष आपला जाहीरनामा तयार करणार आहे. त्या दृष्टीकोनातून गुरूवार दि. 14 ऑक्टोबर रोजी मडगावच्या आदर्श हॉलमध्ये मडगाव परिसरातील विविध घटकांकडे संवाद साधला जाणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख ऍड. रमाकांत खलप व एल्विस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेसचा जाहीरनामा हा सर्वांग स्वरूपाचा असेल. त्यासाठी जनतेकडे थेट संवाद साधला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गोव्यात एकूण बारा ठिकाणी जनतेशी खुल्या पद्धतीने संवाद साधला जाईल. याची सुरवात मडगाव मतदारसंघातून 14 रोजी संध्याकाळी 5 वाजता आदर्श हॉलमध्ये होणार आहे. यावेळी पक्षाचे गोवा निवडणूक प्रमुख पी. चिदंबरम तसेच इतर नेते उपस्थित राहणार आहेत. या खुल्या संवादात  बुद्धीजीवी, व्यावसायिक, विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, उद्योजक तसेच संबंधित माणसे, व्यापारी वर्ग, मोटारसायकल पायलट, टेक्सी चालक, फुटपाथवरील विक्रेते, बस मालक, ड्रायव्हर आणि कंडक्टर, लघु उद्योजक, मच्छीमार, पर्यावरणप्रेमी अशा सर्व घटकांशी काँग्रेसचे नेते संवाद साधणार असून त्यांच्या मागण्या व गरजा जाहीरनाम्यातून पूर्ण केल्या जातील असे ऍड. रमाकांत खलप म्हणाले.

गोव्यासमोर गंभीर अशी आर्थिक समस्या उभी ठाकली आहे. गोव्यावर मोठा कर्जा डोंगर आहे. महसूल नष्ट झालेला आहे. नोकऱया-व्यवसाय नष्ट झालेला आहे. अशा उग्र परिस्थिती काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर तोंड कसे देणार, या समस्यावर कशी मात करणार, कोणत्या योजना राबविणार याचा तपशील सुद्धा जाहीरनाम्यात घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. 

काँग्रेस पक्षाने सामाजिक घटकांसाठी जे काम केलेले आहे ते कोणीच नाकारू शकत नाही. ‘मनरेगा’ ही योजना काँग्रेसने चालीस लावून अनेकांना रोजगार मिळवून दिला. दारिद्रय़रेषेखाली असलेल्या लोकांना दारिद्रय़रेषेतून वर काढले. पण, आत्ताच्या परिस्थितीने दारिद्रय़रेषेतून वर आलेले लोक पुन्हा दारिद्रय़रेषेखाली गेलेले आहेत असे एल्विस गोम्स यावेळी म्हणाले. जनतेशी थेट संवाद साधून जनतेच्या समस्या ऐकून घेऊन त्या काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानतंर सोडविण्यास प्राधान्य दिले जातील असे श्री. गोम्स म्हणाले.

या पत्रकार परिषदेला मडगाव गट काँग्रेसचे अध्यक्ष गोपाळ नाईक व संपूर्ण गोव्याचे समन्वयक अश्विन खलप उपस्थित होते.

Related Stories

इंज्युरी वेळेतील राहुलच्या गोलने ब्लास्टर्सची बेंगलोरवर मात

Amit Kulkarni

साबांखा मंत्र्यांचा कंत्राटदाराला दणका

Omkar B

बाये सुर्लात आज होमकुंड उत्सव

Patil_p

सांगोल्डात ट्रक मोटरसायकल अपघातात गिरीतील तरुणाचा मृत्यू

Amit Kulkarni

सत्तरीत विविध प्रकारच्या लागवडीला सुरुवात

Amit Kulkarni

वाळपई-भुईपाल रस्त्यावर खड्डय़ांचे साम्रज्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!