प्रतिनिधी /पणजी


गोवा नागरी सेवेतील 3 ज्येष्ठ अधिकाऱयांना केंद्र सरकारच्या आयएएस सेवेत बढती देण्यात आली असून ते आता आयएएस अधिकारी बनणार आहेत. निखिल देसाई, प्रसन्ना आचार्य आणि विजय परांजपे या तीन अधिकाऱयांना सदर बढती मिळाली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. त्यांनी गोवा सरकारच्या विविध खात्यात महत्त्वाची पदे भूषविली असून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ते तिन्ही अधिकारी आयएएस सेवेसाठी पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गोवा नागरी सेवेतील आठ अधिकाऱयांना आयएएस सेवेसाठी बढती मिळाली होती.