Tarun Bharat

गोव्याच्या भवितव्याचा आज फैसला

विधानसभेच्या 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात : 11.64 लाख मतदार, 10 मार्च रोजी होणार निकाल

प्रतिनिधी /पणजी

गोवा राज्य विधानसभेसाठी आज सोमवार दि. 14 फ्sढबुवारी रोजी होत असलेल्या निवडणूक व प्रत्यक्ष मतदानाची तयारी पूर्ण झाली असून विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष असे मिळून एकूण 301 उमेदवार 40 जागांसाठी रिंगणात आहेत. राज्यातील सुमारे 11.64 लाख मतदार त्यांचे भवितव्य घडवणार असून ते 25 दिवस मतदान यंत्रात बंद राहणार आहे. येत्या 10 मार्च रोजी मतमोजणी होऊन कोणते राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार आमदार म्हणून बाजी मारतात ते समोर येणार आहे. या निवडणुकीत मतदारांची खरी कसोटी लागणार असून कोणत्या राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते की त्रिशंकू विधानसभा होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यातील 40 मतदारसंघातून बहुरंगी लढती होणार असून दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढती कुठेच नाहीत. शिवोली मतदारसंघात सर्वात जास्त 13 उमेदवार असून 5 मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 5 उमेदवार आहेत. त्यात †िडचोली, पर्वरी, सांताप्रुझ, मडगाव, बाणावलीचा समावेश आहे. सांखळी मतदारसंघात 12 उमेदवार असून कुंकळ्ळीमध्ये 10 उमेदवार रिंगणत आहेत. इतर सर्व मतदारसंघात 6 ते 9 उमेदवार एमेकांशी लढत आहेत. काँगेस-गोवा फ्ढाŸरवर्ड युती, मगो-तृणमूल काँगेस युती या निवडणुकीत उतरल्या असून राष्ट्रवादी काँगेस-शिवसेना अशी तिसरी युती देखील रिंगणात आहे. त्या शिवाय भाजपा, आरजी, आप, हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक आखाडय़ात आहेत.

सर्वच पक्षांकडून विजयाचे दावे

सर्व प्रमुख राजकीय पक्षंानी, त्यांच्या नेत्यांनी आपापल्या विजयाचे दावे केले असून आपल्या पक्षाचेच सरकर स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे. भाजपाच्या काही बंडखोर अपक्ष उमेदवारांनी देखील निवडून येणार असल्याची खात्री वर्तवली आहे. अनेक आजी-माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आमदार यांचे भवितव्य या निवडणुकीत पणास लागले असून त्यांना मतदार पुन्हा संधी देणार की घरी बसवणार याचा फैसला आजच्या मतदानातून होणार आहे. सदर निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता असून त्यासाठी सर्वांना 10 मार्चची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भाजपमध्ये दोन ठिकाणी बंडखोरी

या निवडणुकीत काही मतदारसंघात लक्षवेधी लढती होणार असून त्याकडे संपूर्ण गोव्यासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपूत्र उत्पल पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातून भाजपाचे आघाडीचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधात अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. तर मांदे मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अपक्ष उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपाचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्या विरोधात आवाज बुलंद केला आहे.

मडगाव मतदारसंघात काँगेसचे उमेदवार दिगंबर कामत यांचा सामना भाजपाचे उमेदवार मनोहर आजगांवकर यांच्याशी रंगणार आहे. भाजपामधून राजीनामा देऊन काँगेसमध्ये सामील झालेले माजी मंत्री मायकल लोबो हे कळंगुट मतदारसंघात भाजपाचे उमेदवार जोसेफ्ढ सिक्वेरा यांच्याशी दोन होत करणार आहेत. सांगे मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुभाष फ्ढळदेसाई यांना अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर यांनी आव्हान दिले आहे. कुठ्ठाळीत भाजपाच्या माजी मंत्री व अपक्ष उमेदवार एलिना साल्ढाणा या भाजपाचे उमेदवार नारायण नाईक यांच्याशी टक्क्र देत आहेत. तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सांखळी मतदारसंघातून काँगेसचे धर्मेश सगलानी यांनी आव्हान उभे केले आहे. या सर्व लढती चित्तवेधक ठरणार आहेत.

कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 1722 मतदान केंद्राची सजता करण्यात आली असून आज रविवारी दुपारनंतर तालुका स्तरावरून निवडणूक कर्मचारी अधिकारीवर्ग मतदान यंत्रासह इतर सामूग्री घेवून मतदान केंद्रावर पोहचले आहेत. त्यांनी मतदानासाठी सर्व यंत्रणा तयार ठेवली असून सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष मतदानास प्रारंभ होणार असून ते सलग सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे.

दरम्यान, 80 वर्षावरील सुमारे 8412 मतदारांनी तसेच 1429 दिव्यांग मतदारांनी आपापल्या घरातून टपाल मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्वरीत संबंधीत मतदार आज टपालाद्वारे मतदान करणार असल्याचे सांगण्यात आले.

मतदानासाठी ओळखपत्रे

मतदारांना मतदान करण्यासाठी ओळखपत्राचा पुरावा सादर करणे बंधनकारक असून खालीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवण्याची सूचना केली आहे.  मतदारयादीत नाव असल्याशिवाय मतदान करता येणार नाही. ओळखपत्र पुरावा 1) मतदानकार्ड 2) आधारकार्ड 3) पॅनकार्ड 4) बँक/पोस्ट पासबुक (फ्ढाsटोसह) 5) मनरेगा जॉबकार्ड 6) हेल्थ इन्शुरन्स कार्ड 7) वाहन परवाना 8) पासपोर्ट 9) राज्य/ केंद्र सरकारचे ओळखपत्र 10) पेन्शन ओळखपत्र 11) स्मार्टकार्ड (आरजीआय- एनपीआर) वरील पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवले पाहिजे असे निवडणूक आयोगाने सूचित केले आहे.

Related Stories

मंत्रिपदे अद्याप गुलदस्त्यात!

Patil_p

सोनारबाग उसगाव येथे बंधाऱ्याला जोरदार विरोध स्थानिकांनी काम बंद पाडले

Amit Kulkarni

पत्रादेवीत दहा लाखांची चोरटी दारु जप्त

Patil_p

भिरोंडा पंचायत क्षेत्रातील मड्डीवाडा, पिळयेकरवाडा गावात तीन दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई

Amit Kulkarni

वैष्णवी च्यारी हिला मोबाईल संच भेट

Patil_p

शिवाजी महाराज हे युगपुरुष : कामत

Amit Kulkarni