Tarun Bharat

गोव्याच्या राज्यपालांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

प्रतिनिधी / डोना पोला

गोवा विधानसभेसाठी आज दि. 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.या पार्श्वभूमीवर आज सकाळी गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरण पिल्लई यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी बोलताना त्यांनी गोवा विधानसभा निवडणूक ही पारदर्शकपणे पार पडत असल्याचे मत व्यक्त केले.गोवा विधानसभेसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. आज सकाळी सात वाजता डोना पोला येथील तळेगाव मतदार संघातील मतदार केंद्र १५ इथं गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई आणि पत्नी Adv. रिता श्रीधरन यांनी ही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना राज्यपाल यांनी, गोवा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पडत आहे. सर्व ठिकाणी सुरक्षित आणि सुरळीतपणे मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन केले.

यावेळी ही गोव्यात भाजपचेच सरकार येईल – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही मतदान केले. मात्र मतदानापुर्वी माध्यमांशी संवाद साधताना सावंत म्हणाले कि, ‘मला विश्वास आहे, यावेळी ही गोव्यात भाजपचेच सरकार येईल. गोव्याची जनता पुन्हा भाजपचा डबल इंजिनचं सरकार निवडूण देईल याची मला खात्री आहे’. त्यामुळे आज गोव्यातील ४० मतदारसंघातील एकुण ३०१ उमेवारांचे भवितव्य आज मतपेट्यांमध्ये बंद होणार आहे.

Related Stories

भंडारी समाजातील कुटुंबाच्या जनगणनेचा 1 जानेवारीला देवगडात होणार शुभारंभ

Anuja Kudatarkar

संगीत हा माझ्या जीवनाचा श्वास!

Amit Kulkarni

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली शाहू महाराजांची भेट

Archana Banage

नव्या विधानसभेत ओबीसींचे प्रमाण सर्वाधिक असावे

Amit Kulkarni

कर्नाटक: एसएसएलसी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Archana Banage

कडधान्य घोटाळ्यांमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था कोलमडली

Patil_p