Tarun Bharat

गोव्यातील खाजन शेती पुनरुज्जीवित करणार

आमदार वीरेश बोरकर यांचे आश्वासन : सांत आंदेतील खाजन शेत जमिनीची पाहणी

पणजी : सांत आंदे मतदारसंघासह संपूर्ण राज्यातील खाजन शेतजमिनी पुनरुज्जीवित करणार आहोत. सामुदायिक शेतीवर लक्ष केंद्रित करणार आहे. कारण हा सामाजिक, आर्थिक नमुना आहे, अशी माहिती आरजीपीचे सांत आंदे मतदार संघाचे आमदार वीरेश बोरकर यांनी दिली. शुक्रवारी सकाळी खाजन शेत जमिनीची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

     सांत आंदेचे आमदार वीरेश बोरकर यांनी आज शुक्रवारी सकाळी  तिसवाडी मामलतदार, तलाठी, डब्लूआरडी अधिकारी, मृदसंधारण अधिकारी, मुंडकार संघटनेचे अध्यक्ष आणि शेतकऱयांच्या उपस्थितीत नेवरा-मंडूर खाजन जमिनीची पाहणी केली. त्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या खाजन जमिनीत गेल्या एक दशकांपासून खारे पाणी शेत जमिनीत शिरण्याची समस्या भेडसावत आहे. क्षारयुक्त पाणी शेतात घुसल्याने शेतकरी शेती लागवडीखाली आणू शकत नाही. यापूर्वी अनेक सर्वेक्षणे, तपासण्या करण्यात आल्या. व नावापुरत्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यांनी या खाजन शेत जमिनीला पुनरुज्जीवित करण्यासाठी कधीही गांभीर्याने काम केले नाही. खाजन शेतातील समस्यांकडे  संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज सुमारे  750 शेतकरी त्रस्त आहेत, असे ते पुढे बोलताना म्हणाले.

फुटलेल्या बांधाची तत्काळ दुरुस्ती काम सुरू करण्यात येणार आहे. खाजन शेती पेरणी लागवड करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. खाजन शेत जमीन व शेतकऱयाची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

  खाजन शेती संदर्भात  प्राधान्याने एक सामायिक बैठक  घेण्याचे व त्यावर चर्चा करण्याचे तिसवाडीचे मामलतदार व इतर संबंधित खात्यांच्या अधिकाऱयांनी यावेळी  मान्य केले.

यावेळी शेतकऱयांनीही मनसोक्तपणे अधिकाऱयांशी बोलून आपल्या समस्या व तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. स्थानिक शेतकऱयांच्या देखरेखीखाली खाजन शेत जमिनीतील बांधांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Related Stories

एक नवीन जन्म घेतलेली व्यक्ती म्हणून उदयास

Patil_p

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर पहिल्या गोवा भेटीवर

Patil_p

संदीप खांडेपारकरांचे भाजपाला आव्हान

Amit Kulkarni

गोवा मुलींच्या हॉकी संघ कप्तानपदी प्रज्वला हरमलकर

Amit Kulkarni

लोकांना विश्वासात घेऊन फातोर्डात भरघोस विकासकामे

Amit Kulkarni

पिळगाव चामुंडेश्वरी देवस्थानात आजपासून नवरात्रोत्सव

Amit Kulkarni