Tarun Bharat

गोव्यातील नवनिर्वाचित आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये केसरी ग्रामदैवता चरणी नतमस्तक

ओटवणे/ प्रतिनिधी-

मुळचे केसरी येथील तथा गोवा येथील नवनिर्वाचित अपक्ष आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये यांनी केसरी गावचे ग्रामदैवत स्वयंभूचे दर्शन घेत कृपा आशीर्वाद घेतला. यावेळी केसरीवासियांच्यावतीने आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात करण्यात आला.
डॉ चंद्रकांत शेट्ये गोवा येथे व्हिजन रुणालयात यशस्वीरीत्या रुग्णसेवा करीत असुन सावंतवाडीतही ते आठवड्यातून एकदा सेवा देतात. त्यांना सामाजिक कार्याची आवड असुन नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभेत अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या मुळ केसरी गावाला भेट दिली.


यावेळी डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केसरी गावातील लोकांचे प्रेम व स्वयंभू सावंत देवस्थानचा आशिर्वाद आपल्या पाठीशी सदैव असल्याने आपण वैद्यकीय क्षेत्रासह प्रथमच आमदारकीच्या निवडणुकीत यश संपादन केल्याचे सांगुन गेल्या कित्येक वर्षांपासून केसरी गावाशी व या देवस्थानशी आपल्या घराण्याची असलेली परंपरा यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. यावेळी केसरी गावचे सरपंच देवेंद्र सावंत, गावचे मानकरी श्रीकृष्ण सावंत, सीताराम सावंत, दीपक सावंत, विष्णू सावंत, रामकृष्ण सावंत, दत्ताराम सावंत, सुशांत नाईक, अनिल सावंत, ॲड प्रितेश सावंत आदी उपस्थित होते

Related Stories

कोयनेच्या अवजलापासून 11 ठिकाणी वीजनिर्मितीचा प्रस्ताव

Patil_p

जि. प. शाळांमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम

NIKHIL_N

कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

NIKHIL_N

रत्नागिरी : खेडच्या पाणीटंचाईप्रश्नी आमदार योगेश कदम आक्रमक

Archana Banage

बैलगाडी अंगावरून गेल्याने मालक जखमी

NIKHIL_N

जिह्यात ‘डेल्टा प्लस’चे आणखी 2 रूग्ण

Patil_p