Tarun Bharat

गोव्यातील शेती जमीन पुन्हा लागवडीखाली आणणारः मनोज परब

प्रतिनिधी /पणजी

गोव्यात जी खाजण जमीन पडिंग अवस्थेत आहे ती शेतीच्या लागवडीखाली यावी आणि युवा पिढीने, गोव्यातील शेतकऱयांनी शेतीकडे पुन्हा वळावे आणि त्यातून उत्पादन काढून उदरनिर्वाह चालवावा या हेतूने रिव्ह?ल्युशनरी गोवन्स पक्षाने सोमवारी त्यांच्यासाठी नवीन धोरण जाहीर केले. स्वतंत्र वेळी दोन तृतीय जनता शेतीवर अवलंबून होती. बाराही तालुक्मयात प्रशिक्षण केंद्र सुरू केले जातील.

पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनोज परब व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सरकारचे धोरण व्यवस्थित रित्या नसल्याने सर्व शेत जमनि आज पडिंग अवस्थेत दिसून येतात. ही शेतजमीन राजकीय नेत्यांनी कमी दरात खरेदी करून त्यावर बेकायदेशीर प्रकल्प उभारून त्यातून पैसा करण्याचा एक व्यवसाय सुरू केला आहे. याला आळा घालण्यासाठी आणि शेताला चालना देण्यासाठी आरजीने हा धोरण सरकार स्थापन करताच प्रत्यक्षात आणण्याचे वचन दिले. हा तोरण शेतकऱयांचे, शेतीतील तज्ञांचे व युवकांचे विचार घेऊन तयार करण्यात आला आहे.

गोव्यातील पिकांना काजू, नारळ व इतर पिकांना योग्य तो भाव मिळवून देण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध केली जाईल. तसेच पाळीव प्राण्यांच्या व्यवसायात असणाऱयांना व्यवसाय वाढवण्यासाठी सोयीस्कर कर्ज व इतर सुविधा उपलब्ध केल्या जातील. शेतीचे प्रशिक्षण युवकांना दिले जाईल. शेतकऱयांनी संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक देखील 24 तास उपलब्ध असेल. संद्रिया लागवडीवर जास्त भर दिली जाईल असे परब यांनी सविस्तर सांगितले.

Related Stories

‘कोविड’चा शनिवारी एकच रुग्ण

tarunbharat

‘स्वच्छ पंचायत’ उपक्रमासाठी पुढाकार घ्या

Patil_p

मतदानावेळी येणारा जातीयवाद मोडून काढा

Patil_p

गोवामुक्ती संग्रामाचा इतिहास प्रेरणादायी

Amit Kulkarni

पोलीस मेगा भरतीत मेगा घोटाळा

Patil_p

रंगकर्म अफसर हुसेन काळाच्या पडद्याआड

Amit Kulkarni