Tarun Bharat

गोव्यात आज जोरदार वारे वाहण्याची शक्यता

पणजी वेधशाळेचा अंदाज : काही भागात मध्यम पाऊस

प्रतिनिधी / पणजी

लक्षद्वीपच्या बाजूला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे चक्रिवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून गोव्यात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून आज व उद्या राज्यात काही भागात मध्यम प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार 27 ते 30 मे या दरम्यान राज्यात विजांच्या गडगडाटासह मध्यम तथा हलका पाऊस पडू शकतो. मात्र या दरम्यान राज्यातील सर्वच भागात विशेषतः किनारी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर दि. 29 व 30 रोजी वाढणार आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ कमी दाबाचा जो पट्टा निर्माण झालेला आहे. हळुहळु त्याचे चक्रिवादळात रुपांतर होत आहे. आज त्याबाबतची सविस्तर माहिती भारतीय मौसम कार्यालयाद्वारे जारी होईल.

वादळ गोव्यापासून शेकडो मैल दूर

लक्षद्वीप जवळ तयार होणारे हे वादळ गोव्यापासून बरेच दूर आहे. या वादळाची  दिशा अद्याप निश्चित नाही. संभाव्य वादळाचा गोव्याला कितपत धोका आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अरबी समुद्रातील हे वादळ भारतापासून बरेच दूर आहे. जर वादळ पुर्वेच्या दिशेने सरळ रेषेत गेले तरच गोव्याला धोका संभवतो. या उलट हे वादळ गोव्यापासून शेकडो मैल दूर असल्याने जर ते उत्तरेच्या दिशेने सरकले तर ते थेट ओमानला धडकू शकते.

Related Stories

केजरीवाल यांच्या घरोघरी भेटीने मतदार भारावले

Patil_p

शॅक व्यवसाय ऑक्टोबरपासून सुरू करण्याची सरकारची तयारी

Patil_p

गोमेकॉच्या आवारातून एक महिन्याच्या बालकाचे अपहरण

Amit Kulkarni

शाळेत विद्यार्थी-शिक्षकांच्या उपस्थितीचा घेणार मागोवा

Amit Kulkarni

आरपीआयचा भाजपला पाठिंबा : रामदास आठवले

Amit Kulkarni

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात स्वतंत्र ‘हृदयरूग्ण’ विभाग

Amit Kulkarni