Tarun Bharat

गोव्यात काँग्रेस स्थिर सरकार स्थापन करेल – पी चिदंबरम

Advertisements

प्रतिनिधी / पणजी

काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी रविवारी गोवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परीषद घेतली यावेळी ते बोलत होते. काँग्रेसला स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत मिळेल असा विश्वास आहे कारण लोकांनी तसा पाठिंबा दिला आहे आणि लोक काँग्रेस बरोबर आहेत. त्यांनी निदर्शनास आणून दिले की भाजपने जे काँग्रेस बरोबर केले तेच आता त्यांच्या बरोबर घडत आहे. त्यांचे नेते त्यांना सोडून जात आहेत. यासाठी म्हणतात ना, की भाजपने पेरलेले विष आता विषाच्या रूपात वर येत आहे आणि हे सध्याच्या राजकिय घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे.असे चिदंबरम यावेळी म्हणाले.

या वर्षीच्या ’बीटिंग रिट्रीट सोहळ्यातील’ सुरांच्या यादीतून महात्मा गांधीजींचे आवडते पारंपारिक ख्रिश्चन भजन ‘अबाइड विथ मी’ वगळल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, चिदंबरम म्हणाले की यामुळे देशातील लोक दुखावले आहेत. ही धून 1950 पासून दरवर्षी वार्षिक समारंभात वाजवली जाते. “महात्मा गांधीजींनी हे धर्मनिरपेक्ष भजन लोकप्रिय केले होते. ते या सोहळ्यात वाजवायला हवे. ” असे चिदंबरम म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना चिदंबरम म्हणाले की, भाजपने काँग्रेससोबत जे केले आता त्यांनाच ते भोगावे लागत आहे. ‘त्यांचे नेते त्यांना सोडून जात आहेत.’’ असे ते म्हणाले. सर्व उमेदवारांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्र्यांचा नाव जाहीर केले जाईल, असे ते म्हणाले. “मुख्यमंत्र्यांचे नाव आता जाहीर करायचे की नंतर ते आम्ही ठरवू.” असे ते म्हणाले. चिदंबरम म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मिळत असलेला पाठिंबा पाहता लोक त्यांना स्थिर सरकारसाठी बहुमत देतील असा विश्वास आहे.

Related Stories

आठ राज्यांना मिळणार नवे राज्यपाल

datta jadhav

ब्रह्मदेव देवस्थानमुळे ब्रह्मकरमळीला पर्यटनदृष्टय़ा महत्त्व

Amit Kulkarni

लातूरजवळ झालेल्या अपघातात दोघे जण ठार

Abhijeet Khandekar

आपच्या रोजगार यात्रेस सर्वत्र जोरदार प्रतिसाद

Amit Kulkarni

आचारसंहितेपुर्वीच दहा हजार नोकऱया

Omkar B

‘क्वारंटाईन’ प्रक्रियेबाबत पालिका अंधारात

NIKHIL_N
error: Content is protected !!