Tarun Bharat

“ गोव्यात भाजप ४० पैकी ४२ जागा जिंकेल”

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण

गोवा विधानसभा निवडणुकीची रंगात दिवसेंदिवस वाढत आहे. गोव्यात सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप ताकदीने प्रयत्न करत आहे. भाजपचे दिग्गज नेते गोव्यात प्रचारासाठी आले आहेत. देवेंद्र फडणवीस तर गोव्यात तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे शिवसेनाही गोव्यात पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढण्याचं ठरवलं असून निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे गोव्याचा दौरा करणार आहेत.

दरम्यान, गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती आहे. शिवसेना गोव्यात भाजपाला धक्का देण्यासाठी रणनीती आखत आहे. शिवसेनेने प्रचाराचा सपाटा लावला आहे. आज आदित्य ठाकरे हे भाजपाचे गोव्यातील मुख्यमंत्री असणाऱ्या प्रमोद सावंत यांच्या सांखळी या मतदारसंघामध्ये सभा घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय. पेडणे इथे आदित्य काही राजकीय भेटीगाठी घेणार आहेत. मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघात उद्या सभा आहे, असा गोव्यात प्रचार आणि विस्तार शिवसेनेचा सुरु आहे, विधानसभा निवडणुक झाल्यावर लोकसभा निवडणुकीची तयारी करणार असल्याचंही यावेळी राऊत म्हणालेत.

शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आज आदित्य ठाकरे गोव्यात येणार आहेत. भविष्यात आम्ही गोव्यामधील लोकसभेच्या दोन्ही जागा आम्ही लढवणार आहोत, असं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. यावेळी राऊत यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा २२ जागा जिंकेल या दाव्यासंदर्भातही भाष्य केलं.

“ते एका पक्षाचे नेते आहेत. त्यांनी असं आत्मविश्वपूर्ण बोलणं गरजेचं आहे. ११ पैकी ११ जिंकू असं आम्हीही म्हणतो. काँग्रेस म्हणतंय आम्ही जिंकू, इतर पक्षही जिंकण्याचा दावा करतायत,” असं राऊत फडणवीसांच्या वक्तव्यावर उत्तर देताना म्हणाले. तसेच पुढे टोला लगावाताना भाजपला गोव्यामध्ये ४० पैकी ४२ जागा मिळतील, असंही राऊत म्हणाले.

Related Stories

वादानंतर सरकारचा मोठा निर्णय; ‘हे’ आहेत सुधारित निर्बंध

Abhijeet Shinde

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला भरधाव पिकअपचा धक्का

Rohan_P

प्रजासत्ताक दिन संचलनात राफेलचा सहभाग

Patil_p

सोलापूर शहरात २९ तर ग्रामीणमध्ये १७१ रुग्णांची भर; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरच : पटेल

Patil_p

आसाममधील 34 पैकी 11 जिल्हे मुस्लीमबहुल

Patil_p
error: Content is protected !!