Tarun Bharat

गोव्यात रेल्वे घातपाताचे षडयंत्र उघड

प्रतिनिधी / मडगाव :

ज्या रुळावरुन रेल्वे धावत असते त्या रुळाखालच्या काँक्रीट स्लीपर्सचे तुकडे करुन आणि रेल्वे रुळावर मोठमोठे दगड उभे करुन मध्यरात्रीच्या सुमाराला गोव्यात रेल्वे घातपात घडवून आणण्याचा काही असंतुष्ठांनी प्रयत्न केल्याचे उघडकीस आल्याने राज्यात खळबळ माजली आहे. मात्र, दक्ष रेल्वे कर्मचाऱयांमुळे हा प्रकार वेळीच नजरेस आल्यामुळे संभाव्य मोठी रेल्वे दुर्घटना टळली आहे.

रेल्वेतून प्रवास करणाऱया शेकडो प्रवाशांच्या प्राणाकडे खेळ खेळल्याप्रकरणी  तपास यंत्रणेने सध्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गंभीर गुन्हा नोंद केला आहे.

घातपाताचा प्रकार घडला 25 मेरोजी

 पेडणे आणि थिवी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान 25 मे 2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला होता. मध्यरात्रीच्या सुमाराला रेल्वे घातपात करण्याचा अज्ञात आरोपीनी केलेला प्रयत्न वेळीच उघडकीस आल्याने त्या दिवशी मोठी रेल्वे दुर्घटना टळली आहे. या प्रकाराची सखोल पाहणी करेपर्यंत आणि निष्कर्षापर्यंत येईपर्यंत कोकण रेल्वे महामंडळाला काही वेळ गेला आणि त्यानंतरच या प्रकरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

या प्रकरणाचे गांभीर्य पाहून तपास यंत्रणेने या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशा प्रकारचा गंभीर गुन्हा नोंद केला आहे.

स्लिपर्सचे तुकडे, रुळांवर मोठमोठे दगड

कोकण रेल्वे महामंडळाचे ज्येष्ठ विभागीय अभियंत्याने या प्रकरणी तपास यंत्रणेकडे तक्रार केली.  पेडणे व थिवी रेल्वे स्थानकादरम्यानच्या  केएम/ 394/1-2 येथे काँक्रीट स्लिपर्सचे तुकडे करण्यात आले होते. त्याचबरोबर रेल्वे रुळावर मोठमोठे दगड उभे करुन रेल्वेला अपघात घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

रेल्वे रुळांवरुन कोसळविण्याचे षडयंत्र

या रुळावरुन जाणारी रेल्वगाडी घसरून कोसळावी आणि या रेल्वेतून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना धोक्याचे व्हावे किंवा प्रवासी ठार व्हावे हा आरोपींच्या या कृतीमागाचा हेतू असल्याचे कोकण रेल्वे महामंडळाने तपास यंत्रणेकडे केलेल्या तक्रारीत म्हटलेले आहे.

आरोपींना होऊ शकते फाशी किंवा जन्मठेप

अत्यंत घातक असे हे षडयंत्र पाहून तपास यंत्रणेने आरोपींच्या कृत्याची गंभीर दखल घेतलेली आहे. हा गुन्हा खूप गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी म्हणून कोकण रेल्वे महामंडळाने इंडियन रेल्वे ऍक्ट-1989च्या  150(2) (अ) कलमाखाली गुन्हा नोंद करावा अशी शिफारस केली आणि त्यानुसार तपास यंत्रणेने अज्ञात व्यक्तीविरुद्ध हा गुन्हा, या कलमाखाली नोंद केला आहे.

Related Stories

सभापतींविरुद्ध आज सर्वोच्च न्यायालयात याचिका

Amit Kulkarni

अपहरणकर्ते, खूनी हल्ला प्रकरणी त्वरित छडा लावा

Patil_p

कोलवात मशाच पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

Amit Kulkarni

कामुर्ली पीपल्स हायस्कूलमध्ये क्रांतिदिन

Amit Kulkarni

माजी आमदार, साहित्यिक, स्वा.सै. गजानन रायकर यांचे निधन

Omkar B

सार्वजनिक गणेशोत्सवातून सामाजिक सलोखा दृढ होतो

Patil_p