Tarun Bharat

गोव्यात शुक्रवारी बळींच्या संख्येत किंचित घट

Advertisements

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात शुक्रवारी कोरोना बळींची संख्या काही प्रमाणात घटली असून तिघांना जीव गमवावा लागला तर 519 जणांना नव्याने कोरोनाची बाधा झाली. काल 724 जणांनी कोरोनावर मात केली. बळींची एकूण संख्या 386 झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 5614 झाली आहे.

 संशयित रुग्ण म्हणून 269 जणांना गोमेकॉतील आयसोलेशन वॉर्डामध्ये भरती करण्यात आले असून 325 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 31071 झाली असून त्यातील 25071 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील काही दिवस दररोज आठ ते नऊ या संख्येने कोरोनाचे बळी जात होते. ही संख्या काल शुक्रवारी कमी झाली असली तरी प्रत्येक दिवशी नव्याने सापडणाऱया कोरोनाबाधितांची संख्या 500 ने वाढतच आहे. काल 1981 जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यातील 519 जण पॉझिटिव्ह मिळाले.

विविध आरोग्य केंद्रांतील कोरोनाबाधितांची संख्या पुढिलप्रमाणे : डिचोली 217,  सांखळी 412, पेडणे 226, वाळपई 233, म्हापसा 278, पणजी 339, हळदोणा 137, बेतकी 128, कांदोळी 140, कासारवर्णे 79, कोलवाळ 39, खोर्ली 219, चिंबल 227, शिवोली 213, पर्वरी 401, मये 51, कुडचडे 101, काणकोण 109, मडगाव 433, वास्को 319, बाळ्ळी 54, कासावली 149, चिंचिणी 58, कुठ्ठाळी 272, कुडतरी 32, लोटली 101, मडकई 80, केपे 86, सांगे 90, शिरोडा 27, धारबांदोडा 123, फोंडा 176, नावेली 63. गोव्यात विविध मार्गाने आलेल्या दोन प्रवाशांना कोरोनाची बाधा झाली आहे.

Related Stories

व्हीपीकेचे अर्बनचे सर्व व्यवहार सहकार निबंधकाच्या निर्देशानुसारच

Amit Kulkarni

सार्व.बांधकाम खात्याच्या भरतीत महाघोटाळा

Patil_p

सुस्त, गलथान कारभारामुळे कोलवाळ तुरुंगात कैद्याचा मृत्यू

Patil_p

बोरी स्वामी विवेकानंद महाविद्यालयातर्फे महिलादिनी कतृत्ववान महिलांचा सन्मान

Amit Kulkarni

पंचायत सचिवाला वाचता येत नाही मराठी!

Amit Kulkarni

राज्याच्या आत्मनिर्भरतेसाठी गाव दत्तक योजना ऑक्टोबरपासून

Patil_p
error: Content is protected !!