पणजी: (रामानंद तारी)
शुक्रवारी राज्यात सात दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. सामाजिक दुरी पाळून मोठी गर्दी टाळत लोकांनी भावपूर्णतेने गणरायाला निरोप दिला. दरवर्षी राज्यात अकरा दिवसपर्यंत गणेशोत्सव सोहळा चालायचा. यंदा सात दिवसांतच गणेशोत्सव सोहळा संपल्यात जमा आहे.कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत साधेपणाने लोकांनी गणेशोत्सव साजरा केला. राज्यात दरवर्षी दीड दिवसांपासून अकरादिवसपर्यंत गणेशोत्सव चालायचा. यंदा बहुतेक भागात दीड दिवसातच गणेश विसर्जन केले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पाचव्या दिवशी तर उर्वरित घरगुती गणपतीचे काल सातव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी वाहने सजविली जायची. त्यावर ध्वनिक्षेपक लावून गणेश आरत्या, भजनांच्या ध्वनीफिती वाजायच्या. गाडीच्या समोर मिरवणूक असायची व तरुण, तरुणी वयस्क माणसेहि ताल धरून नाचायची. यंदा अनेक ठिकाणी हे चित्र दिसले नाहि. लोकांनी असे संकट पुन्हा न येवो, अशी प्रार्थना गणरायाकडे केली. शुक्रवारी संध्याकाळी लवकरच गणेशमूर्ती बाहेर काढून विसर्जन करण्यात आले.