Tarun Bharat

गोहत्या बंदी विधेयक विधानपरिषदेतही संमत

सत्ताधारी-विरोधी सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

प्रतिनिधी/ बेंगळूर

डिसेंबर महिन्यात विधानसभेत संमत झालेले गोहत्या बंदीसाठीचे पशूहत्या प्रतिबंधक आणि संरक्षण विधेयक आता विधानपरिषदेतही संमत झाले आहे. त्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस आणि निजद सदस्यांचा तीव्र विरोध, गदारोळातही आवाजी मतदानाने हे विधेयक संमत करण्यात आले आहे.

मागील अधिवेशनात विधानसभेत गोहत्या बंदी विधेयक संमत करण्यात आले होते. मात्र, विधानपरिषदेत पुरेसे सदस्य संख्याबळ नसल्याने या विधेयकासंबंधी अध्यादेश जारी करण्याची शिफारस राज्य सरकारने राज्यपालांकडे केली होती. राज्यपालांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर या विधेयकाची अंमलबजावणी केली होती. मात्र, अध्यादेशानंतर सहा महिन्यांत हे विधेयक विधानपरिषदेतही संमत करणे अनिवार्य असल्याने या अधिवेशनात सत्ताधारी भाजपने निजदचा पाठिंबा मिळविला आहे.

सोमवारी सायंकाळी पशूसंगोपनमंत्री प्रभू चौहान यांनी पशूहत्या प्रतिबंधक आणि संरक्षण विधेयक विधानपरिषदेत मांडले. यावेळी नारायणस्वामी, आर. बी. तिम्मापूर यांनी या विधेयकाला आक्षेप घेतला. दरम्यान काँग्रेसचे सदस्य नजीर अहमद यांनी विधेयकाची प्रत फेकून आंदोलन सुरू केले. निजद काही सदस्यांनी देखील या विधेयकाला तीव्र विरोध केला. यावेळी निर्माण झालेल्या गदारोळातच उपसभापती एम. के. प्राणेश यांनी विधेयकावर मते मागविली. त्यानंतर आवाजी मतदानाने हे विधेयक संमत झाले. यावेळी सरकारच्या भूमिकेचे खंडन करत काँग्रेस आणि निजदचे सदस्य सभागृहातून बाहेर पडले. त्यानंतर उपसभापतींनी सभागृहाचे कामकाज मंगळवारपर्यंत पुढे ढकलले.

विधेयकाचे समर्थन करताना गृहमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, राज्यात पशूहत्येला प्रतिबंध घालणे अनिवार्य आहे. 1964 च्या कायद्यातील त्रुटी दूर करून नवे विधेयक मांडण्यात आले आहे.

काँग्रेस सदस्यांनी प्रती फाडल्या

विधानपरिषदेत गोहत्या बंदीसाठी पशूहत्या प्रतिबंधक आणि संरक्षण विधेयक संमत झाल्यानंतर सरकारच्या भूमिकेचे खंडन करत काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य नारायणस्वामी, आर. बी. तिम्मापूर आणि नासीर अहमद यांनी विधेयकाच्या प्रती फाडून टाककून संताप व्यक्त केला.

Related Stories

कोरोना परिस्थिती पाहून एसएसएलसी परीक्षांचा निर्णयः शिक्षणमंत्री

Archana Banage

कर्नाटक : एसएसएलसी परीक्षा पुढे ढकलल्या

Archana Banage

कर्नाटकात ३२ हजार ३८३ सक्रिय रुग्ण

Archana Banage

कर्नाटक: पद्मश्री बी. गोविंदाचार्य यांचे निधन

Archana Banage

कर्नाटकात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट

Archana Banage

कर्नाटक लॉकडाऊन : किराणा दुकानं दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहणार

Archana Banage