Tarun Bharat

गौंडवाडजवळ जुगारी अड्डय़ावर छापा; पाच जणांना अटक

सीसीआयबीची कारवाई, 25 हजार रुपये जप्त, दोघे जण फरारी

प्रतिनिधी / बेळगाव

गौंडवाड (ता. बेळगाव) जवळील शेतवाडीत जनावरांच्या शेडला लागूनच सुरु असलेल्या एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकून पाच जुगाऱयांना अटक करण्यात आली आहे. सीसीआयबीचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून पोलिसांनी छापा टाकताच दोघा जणांनी तेथून पलायन केले आहे. बुधवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली आहे.

शेतवाडीत अंदर-बाहर जुगार सुरु असल्याची माहिती मिळताच सीसीआयबीच्या अधिकाऱयांनी अचानक छापा टाकून 24 हजार 700 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलीस निरीक्षक संजीव कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. आर. मुत्नाळ, एस. सी. कोरे, ए. के. कांबळे, एम. एम. वडीयर, सी. जे. चिन्नाप्पगोळ, एस. एस. पाटील, बी. एन. बळगण्णावर आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सुरेश इराप्पा लमाणी (वय 37), मल्लेश सत्याप्पा बुड्री (वय 30, दोघेही रा. कंग्राळी बी. के.), यल्लाप्पा कन्नाप्पा बडकण्णावर (वय 30, रा. हुंचेनट्टी), संतोष चंद्रकांत पाटील (वय 31, रा. कंग्राळी बी.के.), गंगाराम सिध्दाप्पा बडकण्णावर (वय 38, रा. मुत्यानट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. या संबंधी एकूण सात जणांवर काकती पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायदा 87 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

संजू फकिरा गस्ती, कुमार नाईक (दोघेही रा. यमनापूर) अशी पलायन केलेल्या दोघा जणांची नावे आहेत. पोलिसांनी छापा टाकताच संजू व कुमार यांनी तेथून पलायन केले. तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. गौंडवाड गावापासून दोन कि.मी. अंतरावर शेतवडीत असलेल्या जनावरांच्या शेडजवळ अंदर-बाहर जुगार खेळताना ही कारवाई करण्यात आली आहे.

Related Stories

सुळेभावी येथील तरुणाची वडगावात आत्महत्या

Patil_p

कडोलीत खासदार अमोल कोल्हे यांचे झाले जल्लोषी स्वागत

Sandeep Gawade

कोरोनामुळे आणखी तिघा जणांचा मृत्यू

Amit Kulkarni

भारतनगर खासबाग येथील विवाहिता बेपत्ता

Patil_p

जागृतीसाठी तालुकास्तरीय महामेळावा आयोजित करा

Amit Kulkarni

चाकूहल्ल्यात मारुतीनगरचा तरुण जखमी

Patil_p