Tarun Bharat

गौणखनिज प्रकरणी ११ जणांच्या मालमत्तेचा होणार लिलाव

गोडोली/प्रतिनिधी

अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी तालुक्यातील ११ कसूरदारांच्या स्थावर मालमत्ता लिलाव करण्यास उपविभागीय अधिकारी आदेश दिले आहेत. तब्बल १८ लाख ५० हजार रुपयांची ही वसूली करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार आशा होळकर यांनी दिली आहे.

सातारा तालुक्यात गौण खनिजाची अवैध , विनापरवना उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई ही महसूल प्रशासनामार्फत करण्यात येते. मात्र दंडाच्या कारवाईचे आदेश होऊन ही अनेक व्यक्ती कसूरदार असूनही दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करत सनाच्या आदेशाकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष करतात. अनेक महिन्यांपासून वसूली प्रलंबित असणा-या तालुक्यातील अशा ११ प्रकरणांमध्ये १८ लाख ५० हजार ४२७ इतक्या दंडाची रक्कम गुंतलेली असून वसूलीसाठीचे सर्व कायदेशीर उपाययोजना करुनही दंडाची रक्कम वसूल झाली नाही.
या प्रकरणी उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांच्या मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ मधील
तरतुदीनुसार संबंधीत दंड रक्कम थकबाकीदारांच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करुन दंडाची रक्कम धडक कारवाईव्दारे वसूल करण्यात येणार असलेचे तहसिलदार आशा होळकर यांनी सांगितले.

तसेच अनाधिकृत वाळू वाहतूक प्रकरणांमध्ये जप्त करणेत आलेल्या १२ ब्रास वाळूचा लिलाव दि.१५ आणि १८ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालय सातारा आवारात करणेत येणार आहे. त्याचप्रमाणे अशा आणखी उर्वरीत प्रकरणांमध्ये दुय्यम निबंधक सातारा यांचेकडून मुल्यांकन आणि उपविभागीय अधिकारी यांचेकडुन मंजूरी मिळालेनंतर याचप्रकारे स्थावर मालमत्ता लिलावाव्दारे दंडाची रक्कम वसूल करण्याची कारवाई २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत करण्यात येणार आहे,त्यांनी सांगितले.

यांच्या स्थावर मालमत्तेचा होणार लिलाव
१) हणमंत शिंदे (पाडळी) २ लाख १८ हजार ७३५
२) जगन्नाथ शिंदे (पाडळी) १ लाख ४५ हजार ८२३
३) दिनकर भोसले (काशीळ) ७२ हजार ९१३
४) नथू साळुंखे ( नागठाणे) ३६ हजार ४५६
५) सुर्यकांत साळुंखे ( नागठाणे) ३६ हजार ४५६
६) वामन शिंदे ( शिंदेवाडी) ५ लाख ४४ हजार
७) प्रदिप घाडगे आणि कल्पेश घाडगे ( कामेरी ) १ लाख ८२ हजार
८) दिपक सावंत- भंडारे (लिंब) १ लाख ८२ हजार
९) किसन तांबोळी ( अंगापूर वंदन) ६६ हजार
१०) विठ्ठल सोनमळे (लिंब ) १ लाख ८३२ हजार
११) धनाजी सुर्यवंशी आणि रविराज घाडगे (कामेरी) १ लाख ८२ हजार

Related Stories

फुटक्या तळयात उडी घेवून वृद्धेची आत्महत्या

Patil_p

गुजरात सरकारने बदलले ‘ड्रॅगन फ्रूट’चे नाव

Tousif Mujawar

सातारा : एक एप्रिलपासून ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांचे कोरोना लसीकरण

Archana Banage

पृथ्वीराजच्या विजयाने देवठाणेत जल्लोष

Archana Banage

…तर आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल; गडकरींचा मुख्यमंत्री ठाकरेंना पत्राद्वारे गंभीर इशारा

Archana Banage

श्री.छ.प्रतापसिंह उद्यान पूर्णत्वास नेणारच : खासदार उदयनराजे

Patil_p