Tarun Bharat

गौणखनिज वाहतूक प्रकरणी महसूल विभागाची कारवाई

Advertisements

पुलाची शिरोली / वार्ताहर

बेकायदेशीर गौणखनिज वाहतूक प्रकरणी महसूल विभागाने गुरुवारी पुणे बंगलूर राष्ट्रीय महामार्गावरील टोप-शियेफाटा परिसरात सकाळी अकरा वाजता कारवाई केली.

विनापरवाना मुरुम, डबर व क्रश सॅण्डची वाहतूक करणारे पाच डंपर यावेळी जप्त करण्यात आले. पेठवडगावचे मंडल अधिकारी गणेश बर्गे, टोपचे तलाठी जयसिंग चौगले, नागावचे तलाठी तुषार भोसले, पेठवडगावचे आर. ए. जाधव, अंबपचे एकनाथ पाटील, पुलाची शिरोलीचे निलेश चौगले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कासारवाडी (ता. हातकणंगले ) येथील गौण खनिज उत्खनन प्रकरणी पुणे हरित लवादामध्ये तक्रार दाखल आहे. खाजगी खाण मालक गावाच्या सीमेवर असणार्‍या शासकीय व वनविभागाच्या भुखंडावर उत्खनन करुन नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास करण्यास कारणीभूत ठरत आहेत. अशी तक्रार कासारवाडी ता. हातकणंगले येथील लोकप्रतिनिधींनी हरित लवादाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वीही मोठी कारवाई झाली आहे. तरीही वादग्रस्त भुखंडावर बेकायदेशीर उत्खनन सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी मंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाराम नगर टोप ते शिये फाटा दरम्यान वाहतूक करणाऱ्या डंपरवर आज कारवाई करण्यात आली. पंचनामा करून ही वाहने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. यामध्ये संदीप पाटील, प्रकाश पाटील, पवार व मगदूम यांच्या मालकी वाहनांवर ही कारवाई झाली आहे.

बेकायदेशीर गौणखनिज वाहतूक करत रस्त्यावर येणारी वाहने रोखणे हा कारवाईचा पहिला टप्पा आहे. दुसर्‍या टप्प्यात उत्खनन सूरू असताना कारवाई होईल आणि त्यावेळी खासगी व सरकारी मिळकतीचा विषय आल्यास भूमी अभिलेख विभागाच्या सहकार्याने मोजणी करण्यात येईल असे मंडल अधिकारी गणेश बर्गे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

Kolhapur; वाढीव दरासह सर्व ऊसबिले देणारा भोगावती राज्यातील पहिला साखर कारखाना- पी.एन. पाटील

Abhijeet Khandekar

शरद पवार-रावसाहेब दानवे यांचा एकाच कारमधून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

datta jadhav

कबरीभोवतीचा चौथराही तोडला

Patil_p

सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार करणे महिलेच्या अंगलट

Patil_p

पालिकेच्या तीन गाडय़ा भंगारात

Patil_p

जिह्यात पुन्हा बाधित वाढीचा वेग वाढला

Patil_p
error: Content is protected !!