Tarun Bharat

गौरव कुस्ती परंपरेचा

बेळगाव ही क्रीडापटुंना प्रोत्साहन देणारी नगरी आहे. या शहरात विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणारी अनेक मंडळी कार्यरत आहेत. विविध संस्थांच्या माध्यमातून नवनवे क्रीडा प्रकार जोपासले जातात. त्याचबरोबर पारंपरिक क्रीडा प्रकारांना देखील योग्य प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न अव्याहतपणे सुरू असतो. कुस्ती हा देखील प्रकार बेळगावच्या मातीत रूजला आहे आणि या प्रकारासाठी कार्यरत असणाऱया मंडळींचा यथोचित गौरव नुकताच देशाची राजधानी असणाऱया नवी दिल्ली येथे करण्यात आला.

या कुस्ती महोत्सवात बेळगावच्या कुस्तीप्रेमींनी उपस्थिती दर्शविली, राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती महासंघाच्या कर्नाटक राज्य संघ बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेले कुस्तीपटु आणि माजी सैनिक हणमंत गुरव यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच या वेळी बेळगाव विभागातून कुस्ती परंपरेच्या संवर्धनाचा विचार पुन्हा एकदा प्रकट करण्यात आला. 

 अखिल भारतीय कुस्ती महासंघ तसेच युवा खेल प्रोत्साहन संघ यांच्यावतीने महान भारत केसरी भारत कुमार केसरीचे मैदान पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हाध्यक्ष हणमंत मल्हारी गुरव, बेळगावातील विविध संघटनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र मैदान समितीचे प्रदीप देसाई, नागेंद्र पाखरे, पिरनवाडी कुस्ती कमिटी, मल्लाप्पा उचगावकर, खानापूर तालुका कुस्ती संघटना सचिव रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महान भारत कुमार केसरी दोन नं. कुस्ती पहलवान वीर गुलीचा विरुद्ध संजीत कुंडू यांच्यामध्ये ही कुस्ती लावण्यात आली. सदर कुस्तीत संजीत कुंडू यांनी विजय मिळविला असून भारत कुमार केसरीची गदा व सुवर्ण पदक पटकाविले.

अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या आम बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. सुरेंद्र कालीरमण यांच्या नेतृत्वाखाली गुरुग्राम आलीपूर दिल्ली येथे ही वार्षिक बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये माती विभागातील कुस्ती उंच पातळीवर वाढवणे, खुल्या माती विभागात वजन गटात प्रतियोगीता पॉईंंटवर मॅट स्तरावरील कुस्त्या घेण्यात येतील, प्रत्येक राज्यात जिल्हास्तरीय कुस्ती प्रतियोगीता तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील माती विभाग कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, पैलवानाला देशी व समतोल आहाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, मॅटस्तरीय कुस्ती स्पर्धा माती विभागामध्ये करण्यात येतील, युवा पिढीला बेळगाव विभागातून ग्रामीण भागाला राष्ट्रीयस्तरावर कुस्ती प्रोत्साहन दिले जाईल, आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

Related Stories

तिळगुळ घ्या गोड बोला

Patil_p

आरोग्यासाठी प्रभात जागृती

Patil_p

‘बच्चे कंपनी’ रमली स्वयंपाकघरात

Omkar B

व्याख्यानमालेची दीर्घ परंपरा

Patil_p

अमेरिकेत वर्णद्वेशातून उफाळला असंतोष

Patil_p

कचऱयाचा पुनर्वापर

Patil_p