Tarun Bharat

गौरीचे आज होणार आगमन

प्रतिनिधी/ बेळगाव

गणरायांपाठोपाठ आज गौरीचे आगमन होणार आहे. भाद्रपद शुक्लपक्षाच्या ष÷ाrला ज्ये÷ागौरीचे आगमन केले जाते. दुसऱया दिवशी गौरी पूजन तर तिसऱया दिवशी विसर्जन असते. यंदा जितक्मया साधेपणाने गणरायांचे आगमन झाले तितक्मयाच साधेपणाने गौरीचेही आगमन होणार आहे. अर्थात माहेरच्या या लेकीचे कोडकौतुक करण्यात महिला कसर ठेवणार नाहीत.

पुराणकाळात राक्षसांच्या त्रासाला कंटाळून सर्व महिलांनी आपले सौभाग्य अखंड राहण्यासाठी गौरीचा धावा केला. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला राक्षसांचा संहार केला. तेव्हापासून गणपतीच्यापाठोपाठ गौरी पूजन केले जाते. गौरी आणण्याच्या आणि तिची पूजा करण्याच्या वेगवेगळय़ा प्रथा आहेत.

कुणी पाच खडे आणून तिची गौरी म्हणून पूजा करते. कुठे लहान सुघडांची, कुठे कलशाची तर कुठे फुलांच्या रोपांची किंवा तेरडय़ाच्या रोपांची पूजा केली जाते. पूर्वी गौरी रेखाटन हा एक विधी असायचा. अलीकडे बाजारपेठेत गौरीचे तयार मुखवटे मिळतात. श्रावण महिन्यातील ज्ये÷ा गौरीच्या बाजुला भाद्रपदातील गौरी बसविली जाते आणि पूजा केली जाते. गौरी ही माहेरची लेक समजली जाते. त्यामुळे तिच्या आगगमनादिवशी भाजी-भाकरीचा नैवेद्य असतो. दुसरे दिवशी पंचपक्वांन्नांचा थाट असतो.

गौरी पूजनासाठी बाजारपेठेत अनेक तऱहेच्या भाज्यांची आवक वाढली आहे. गौरीची ओटी काकडीची खाप घालून भरली जाते. त्यासाठी काकडीची आवक वाढली असून त्यांचा दरही वाढला आहे. याचबरोबर हळदीची पाने, केळीची पाने, सजावटीसाठीची फुले यांचीही खरेदी तेजीत झाली. गौरीच्या मुखवटय़ांनी महिलांचे लक्ष वेधून घेतले. या मोहक मुखवटय़ांची खरेदी महिलांनी केली असून मंगळवारी या मुखवटय़ांचा वापर करून गौरी पूजल्या जातील.  

Related Stories

स्थायी समिती निवडीसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव

Omkar B

निपाणी महाराष्ट्रात यावी हीच इच्छा

Patil_p

सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणार

Patil_p

एके-47 रायफल चोरीचा तपास एसीपींकडे

Amit Kulkarni

बोगस बियांणामुळे शेतकरी अडचणीत

Patil_p

अज्ञात वाहनाच्या ठोकरीत मोटारसायकलवरील दोन युवक ठार

Patil_p
error: Content is protected !!