Tarun Bharat

ग्रंथालये व वाचनालये सुरु करण्यास अटी-शर्थींसह मान्यता

प्रतिनिधी / सातारा :

सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारची ग्रंथालये व वाचनालये शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी-शर्थींच्या अधिन राहून सुरु करण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

ग्रंथालय व वाचनालयात ज्या नागरिकांनी कोविड-19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, अशाच नागरिकांना प्रवेश देण्यात यावा. ग्रंथालयामध्ये सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये कायमस्वरुपी किमान सहा फूट इतके पर्याप्त सुरक्षित अंतर राखावे. ग्रंथालयामध्ये सर्व नागरिकांनी मास्क घालणे बंधनकारक आहे. तसेच सर्व ग्रंथालय व्यवस्थापकांनी ग्रंथालय वेळोवेळी सॅनिटाझेशन करणे बंधनकारक असून त्याचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहील. आजारी व्यक्तींना ग्रंथालयामध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश देण्यात येऊ नये. कोविड-19 बाबत राज्यस्तरावरुन व जिल्हास्तरावरुन वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.

अटी-शर्थींचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Related Stories

रायरेश्वर येथे स्वच्छता मोहीम व जागता पहारा

Patil_p

पिकअप गाडीत गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

datta jadhav

पोवई नाक्यावरचा रस्ता खचला; बांधकाम विभागाकडून मलमपट्टी सुरु

Archana Banage

सातारा पंचायत समितीच्यावतीने दिव्यांग विद्यार्थ्यांचा गौरव

Patil_p

लसीकरण मंदावले; हेलपाटे मारून नागरिक कंटाळले

datta jadhav

जिल्हा परिषदेचे अभ्यास दौरे नेमके कशासाठी?

Patil_p