Tarun Bharat

ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करा या मागणीसाठी सोलापुरात ‘वंचित’चे आंदोलन

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

हलगीचा कडकडाट… बाराबंदीच्या वेशभूषेत आलेले सिद्धेश्वर भक्त… ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय… हर बोला हर… वंचित बहुजन आघाडीचा विजय असो… श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणाबाजित आज सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने नगरसेवक आनंद चंदनशिवेसह, शहराध्यक्ष गणेश पुजारी व अन्य पदाधिकारी यांची अटक करून परत सुटका करण्यात आली.
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या धर्तीवर सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सिद्धरामेश्वर मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचितचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सिद्धेश्वर भक्त उपस्थित होते. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन आज होणार असल्यामुळे सकाळपासूनच मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात 100 हून अधिक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच सिद्धेश्वर भक्त जमा झाले होते. हलगीचा कडकडाट आणि सिद्धेश्वर फक्त बाराबंदी वेशभूषा घालून आले होते. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. आंदोलनानंतर नगरसेवक आनंद चंदनशिवेसह दहा ते पंधरा जणांना मंदिरात सोडण्यात आले. फोटो पूजनानंतर कार्यकर्त्यांनी सिद्धरामेश्वर चा जयघोष केला. यावेळी शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आला. 

अटी, नियम घालून मंदिर खुले करा
मागील पाच महिन्यापासून ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर बंद आहे. भाविक दर्शनापासून वंचित आहेत. श्रावण महिन्यात हे मंदिर बंद होते. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या आधार त्यावर सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले व्हावे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या काळात नागरिक भयभीत झालेले आहेत. मंदिर उघडल्यामुळे डोळे मिटून ध्यान केल्याने मनातील भीती दूर होण्यास मदत होते. शासनाने नियम व अटी घालून दिल्यास मंदिर खुले करण्यात काहीच हरकत नाही.

-आनंद चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते, नगरसेवक

Related Stories

पिंपरीत नदीपात्र बुजविण्याचा प्रकार

prashant_c

सोलापूर शहरात नवे ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकाचा मृत्यू

Archana Banage

वागदरी येथे ६५ वर्षीय वृद्धेचे चोरट्याने ३५ हजाराचे ऐवज लांबवले

Archana Banage

दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान व विमा वाटप

Archana Banage

दरोडा व घरफोडीतील आरोपी जेरबंद; १८ लाख ७६ हजार मुद्देमाल जप्त

Abhijeet Khandekar

रिलायन्स मार्केटवर निदर्शन करताना आडम मास्तर यांच्यासह सीटूच्या कार्यकर्त्यांना अटक

Archana Banage