Tarun Bharat

ग्रामपंचायतींवर झेंडा नेमका कुणाचा?

आरक्षित निवडून आलेल्या सदस्यांचा की पक्षीय नेत्यांचा : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीला खानापूर तालुक्यात चुरस

पिराजी कुऱहाडे / खानापूर

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला उधाण आले आहे. तालुक्मयातील बहुतांश ग्रामपंचायतींवर निवडणूक आयोगाच्या आरक्षित नियमावलीनुसार अनेकांची बिनविरोध निवड होत आहे. तर अनेक ठिकाणी चुरशीने निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. पण या  निवडणुकीत ग्रामपंचायतीवर निवडून येणाऱया सदस्यांची वर्णी ही कोणा एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या अथवा संघटनेच्या अथक परिश्रमानंतर लागत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीवर आमचाच झेंडा म्हणणाऱया संघटना अथवा पक्षीय नेत्यांनी याचे श्रेय लाटणे कितपत योग्य आहे, याचा नेत्यांनी विचार करणे योग्य ठरेल.

ग्रामपंचायतीची निवडणूक ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण शिकवणारी ठरते. या निवडणुकीत तळागाळातील राजकारण पेटून उठते. घराघरात गटातटाचे राजकारण जेव्हा पेटलेले असते अशावेळी मात्र कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते अथवा संघटनांचे नेते जवळ येत नाहीत. मतदान प्रक्रियेत स्वबळावर अनेकजण निवडून येतात. अनेक जण लाखो रुपये खर्च करून स्पर्धेच्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत. यावेळी मात्र कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचे नेते अथवा संघटनांचे नेते कोणाच्याही प्रचाराला गेले नाहीत. पण आता ग्रामपंचायतींच्या आलेल्या आरक्षणानुसार अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र हस्तक्षेप करत सर्वसामान्य निवडून आलेल्या सदस्यांची गोची होते. ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे आरक्षण पुढील तीस महिन्यांसाठी नुकतेच जाहीर झाले. आणि या आरक्षणानुसार सोमवारपासून अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेलाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून पळवापळवी, आमिषे दाखवून गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. अनेक ग्रामपंचायतींवर आरक्षणानुसार अध्यक्ष-उपाध्यक्षपद अनेक पंचायतीत बिनविरोधही निवडून आले आहेत. परंतु अशा पंचायतींवर बिनविरोध निवडून आलेले सदर अध्यक्षöउपाध्यक्ष कोणा एखाद्या संघटनेचा अथवा राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता असेल यात शंका नाही. मात्र सदर ग्रामपंचायतीमध्ये असणारे सर्वच सदस्य कोणत्याही पक्षाशी अथवा संघटनेशी बांधील असतीलच असे नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूकही कोणत्याही पक्षपातळीवर अथवा संघटनेवर होत नसल्याने याचे श्रेय लाटणे म्हणजे फुकटची प्रसिद्धी मिळविण्याचा एक प्रकार म्हणावा लागेल.

प्रामाणिक सदस्यांची मात्र गळचेपी

ग्रामपंचायतीवर अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी तापलेले राजकारण पाहता अनेक नेतेमंडळी सोप्या मार्गाने गटबाजीसाठी प्रयत्न करत आहेत. कोणा एखाद्या कार्यकर्त्यासाठी पळवापळवीसाठी आपले लॉबिंग लावत आहेत. त्यामुळे गरीब व प्रामाणिक तसेच होतकरू सदस्याला अध्यक्ष करताना अशा प्रामाणिक सदस्यांची मात्र राष्ट्रीय पक्षाचे अथवा संघटनांचे नेते गळचेपी करताना दिसत आहेत. यासाठी ग्रामपंचायतींवर होणारे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे दावेदार सरळ मार्गाने आपले नशिब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अनेक मतलबी अथवा संघटनांचे नेते मात्र यामध्ये अडसर होताना दिसत आहेत. कोणत्याही ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून निवडून येताना एकाही सदस्याने अमुक पक्षाचा किंवा संघटनेचा अशी कधीच हमी अथवा प्रसिद्धी दिली नाही, मग आता अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर हा आपल्या पक्षाचा किंवा संघटनेचा म्हणून आमचाच झेंडा म्हणणाऱया नेतेमंडळींनी सारासार विचार करणे गरजेचे आहे.

विकासाचे व सामाजकार्याचे भान ठेवून उपक्रम हाती घ्यावे

एखाद्या ग्रामपंचायतीवर पक्षाचा अथवा संघटनेचा झेंडा म्हणून प्रसिद्धी घेणाऱयांनी आगामी कालावधीत ग्रामपंचायतीचा विकास करताना येणाऱया अडचणींचा विचार करणे गरजेचे ठरते. जी व्यक्ती अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसते त्याच व्यक्तीला जनतेच्या सामोरे जावे लागते. विकासाचे तसेच सामाजिक कार्याचे भान ठेवून उपक्रम हाती घ्यावे लागतात. पण अशावेळी त्या अध्यक्षöउपाध्यक्षांच्या विरोधात निर्माण झालेली फळी ही विकासकामाला अडचण करणार नाही, याचा विचार करून आगामी काळातील ग्राम विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीवर झेंडा कुणाचा? यापेक्षा ग्रामपंचायतीवर निवडून आलेला अध्यक्ष-उपाध्यक्ष हा सर्वांचाच, अशा पद्धतीने राजनीती राहिल्यास तालुक्मयाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही यात शंका नाही.

अनेकांची निवड बिनविरोध

खानापूर तालुक्मयात अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायतींवर निवडून आलेल्या 623 ग्रामपंचायत सदस्यांपैकी केवळ 51 ग्रामपंचायतींवर अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे दावेदार राहणार आहेत. बऱयाच ग्रामपंचायतींमध्ये मागासवर्गीय जाती, जमाती अ वर्ग अथवा ब वर्गातील गटात मर्यादित सदस्य संख्या आहे. अनेक पंचायतीत निवडून आलेल्या सदस्यांच्या विरोधात दुसरा सदस्य नसल्याने अनेकांची निवड बिनविरोध होत आहे. तर अनेक ग्रामपंचायतींवर अधिकजण एकाच गटातील असतील तर अशा ठिकाणी थोडीफार चुरस होत आहे. पण सामान्य महिला अथवा सामान्य गटातील अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी मात्र रस्सीखेच सुरू आहे. यासाठी गटातटाच्या राजकारणाला उधाण आले आहे. परस्पर गटबाजी झाल्याने सदस्यांची पळवापळवी अथवा मनधरणी करण्यासाठी अनेक राजकीय नेते मदत करत आहेत, हे जरी खरे असले तरी निवडून आलेला अध्यक्ष व उपाध्यक्ष हा कोणा एखाद्या पक्षाचा अथवा संघटनेचा म्हणणे चुकीचे ठरते. यासाठी पंचायतीवर झेंडा आमचा म्हणणाऱयांनी याचा विचार करणे योग्य ठरेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Related Stories

हिंदवी स्वराज्याचा प्रवाह राष्ट्र उद्धारासाठी

Amit Kulkarni

बाप-लेकरांची विषप्राशनाने आत्महत्या

Patil_p

गुढीपाडव्यासाठी धावणार विशेष एक्स्प्रेस

Omkar B

डॉ. रवी पाटील यांना वाढता पाठिंबा

Amit Kulkarni

सात-बारा उतारे मिळण्याची केंद्रे ठरली कूचकामी

Omkar B

ज्ञानसागरातील मौल्यवान मोती श्रीपेवाडीचा ‘मंथन’

Amit Kulkarni
error: Content is protected !!