Tarun Bharat

ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार

वार्ताहर / शिये

ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले. ग्रामपंचायत निवडणूकी संदर्भात शिये, भुयेवाडी व निगवे दुमाला येथील संपर्क दौऱ्यावेळी भुयेवाडी (ता.करवीर) येथे बैठकीत बोलत होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने विकासगंगा गावोगावी पोहचविण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे गावोगावी शिवसेनेचा सरपंच असणे गरजेचे आहे. कार्यकत्यांनी ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य कृष्णात पोवार, भानुदास पाटील, उदय सुतार, संजय पाटील, अरविंद पाटील, तानाजी चौगले, आत्माराम पवार, जालिंदर चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

पुलाची शिरोली-सांगली फाटा चौक सीसी टिव्हीच्या कक्षेत, गुन्हेगारीला बसणार आळा

Archana Banage

कोल्हापूर : कोडोलीतील पोलीस निवासस्थानाची दुरावस्था

Archana Banage

धनदांडग्यांसाठीच महाविकास आघाडी सरकारचे ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष

Archana Banage

Kolhapur : मित्रांनीच केला मित्राचा खून; अपमानास्पद वागणूक दिल्याने काढला काटा

Abhijeet Khandekar

Nasik; नाशिकच्या शास्रार्थ सभेत महंतांची हमरीतुमरी

Abhijeet Khandekar

वळीवडे येथे पंचगंगा नदीमध्ये मृत माशांचा खच, परिसरात दुर्गंधी

Abhijeet Khandekar