Tarun Bharat

ग्रामपंचायत कर्मचाऱी कुटुंबियांच्या हस्ते ध्वजारोहण

Advertisements

गोकुळ शिरगाव / वार्ताहर


गोकुळ शिरगाव( तालुका करवीर) येथील ध्वजारोहण ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची पत्नी व त्यांच्या कुटुंबाच्या हस्ते करण्यात आले.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गोकुळ शिरगाव येथे आजचे ध्वजारोहण ग्रामपंचायत मध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणारे कैलासवासी भीमराव कुरणे यांच्या पत्नी गीता कुरणे यांच्या हस्ते करण्यात आले. भीमराव कुरणे ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता कर्मचारी याबरोबरच गावांमध्ये पाणी सोडण्याचे ही काम करत होते. कोरोनाच्या काळात कामाच्या सेवेत असताना त्यांचे कोरोनाने निधन झाले. अगदी लहान वयातच भीमराव कुरणे यांचे निधन झाल्याने त्यावेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते. शिवाय भिमराव हे स्वभावाने अत्यंत मनमिळावू व कामात अग्रेसर असल्याने त्यांच्याबद्दल गावांमध्ये आदर होता. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच दुःख झाले होते. पण आज गोकुळ शिरगाव चे लोकनियुक्त सरपंच एम के पाटील यांनी भीमराव यांच्या पत्नी गीता कुरणे त्यांच्या आई व दोन मुलांना घेऊन आज त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याने गोकुळ शिरगाव वासियांनी सरपंच एम.के. पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे कौतुक केले.


आजच्या ध्वजारोहन दिनी गोकुळ शिरगाव येथील गेल्या कित्येक वर्षापासून स्मशान शेड चा वादात असलेला प्रश्नसुद्धा लोकनियुक्त सरपंच एम के पाटील यांनी व्यवस्थित हाताळून आज गोकुळ शिरगाव मध्ये स्मशान शेड सुद्धा गावच्या लोकसहभागातून उभा केले . या कामी त्यांना गोकुळ शिरगाव येथे स्थानिक रहिवासी बाळासो चव्हाण यांनी मदत केल्याने त्यांचा यावेळी ध्वजारोहन दिनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि सुशांत चव्हाण विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळे अंगणवाडी सेविका अशा वर्कर्स महिला बचत गट मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Stories

‘वंचित’चे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : ‘लाभांश’ला 31 मार्च 2021 उजाडणार!

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लॅंटच `ऑक्सिजन’वर !

Archana Banage

नृसिंहवाडी दत्त देवस्थान कडून कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी पाच लाख

Archana Banage

विधवा प्रथा बंदी! चर्मकार समाजाने केली प्रथम अंमलबजावणी

Abhijeet Khandekar

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने पुंगावात दागिने लंपास

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!