Tarun Bharat

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास एक लाखाचे बक्षिस माजी सैनिक चंद्रकांत कांबळे यांचे गाव पुढा-यांना आवाहन


व्हनाळी / प्रतिनिधी:


कागल तालुक्यातील साके येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी आणि गावात एकोपा राखावा या उद्देशाने येथील माजी सैनिक चंद्रकात बापू कांबळे (सी.बी.) यांनी एक लाख 51 रूपयाचे ग्रामपंचायतीसाठी बक्षिस जाहिर केले आहे. गावचा विकास व्हावा आणि निवडणूकीतील उधळपट्टी थांबून या उधळपट्टीचा वापर देखील गावच्या विधायक कामासाठी व्हावा आणि याचा सर्वच नागरिांनी गांर्भियांनी विचार करावा अशी विनंतीही त्यांनी दैनिक तरूण भारती शी बोलताना केली.


सध्या तालुक्यात 53 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आसून गावागावात अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत पण गटातटाच्या राजकारणात गावचा विकास होणे बाजूलाच सत्तेसाठी ईष्या पणाला लावून लाखो रूपयाची उधळपट्टी होणार आहे. यंदाच्या निवडणूक रिंगणात वयोवृध्द तसेच युवक,महिला सक्रीय झाल्या आहेत पण गेल्या पंचवार्षीक निवडणूकींचा आंदाज घेतल्यास गावच्या विकासासाठी आद्याप ग्रामपंयायत बिनविरोध झालेलीच नाही . साके येथे ग्रामपंचायत निवडणूकीत ही निवडणूक सर्वच पक्षाचे गटनेते ताकतीने लढवत आहेत.त्यातून संघर्ष थांबविण्यासाठी एकजूटीने गावच्या विकासासाठी एकत्र येवून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी येथील माजी सैनिक चंद्रकात कांबळे ( सी.बी.कांबळे ) यांनी स्वतः आवाहन केले असून त्याबद्द ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी सहा महिन्याची सुमारे 1 लाख 51 रूपये पेश्नन रक्कम बक्षिस म्हणून देणार आहेत शिवाय बिनविरोध झाल्यास ते स्वतः सदस्यही असणार नाहीत अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यातून सर्व गटाच्या गटनेते,युवक,अपक्ष उमेदवार यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी त्यांच्या विनंतीला सहकार्य करून गावातील राजकारण बाजूला ठेवावे व गावच्या सर्वांगिण विकास करावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे.
साके ग्रा प निवडणूकीसाठी सुमारे 11 जागांसाठी गावातून चार गट व अपक्षांसह तब्बल 94 अर्ज दाखल झाले आहेत. प्रत्येक उमेदवाराचा निवडणूकीतील खर्च काढल्यास कांबळे यांच्या म्हणन्यानुसार प्रचंड निधी जमा होवून गावच्या विकतासात मोलाचे योगदान ठरू शकते परंतू माजी जवान कांबळे यांच्या आवाहनाला साके येथील ग्रामस्थ व स्थानिक पुढारी किती प्रसिसाद देतात हे पहाणे औत्सकत्याचे ठरेल.

सहा महिन्याची पेन्शन
22 वर्षे देशसेवा करणा-या माजी जवान चंद्रकांत कांबळे यांची तुटबुंजी शेती आहे. तरी देखील स्वतःपुर्ता विचार न करता त्यांनी आख्या गावासाठी चक्क आपली सहा महिन्याची पेन्शन बक्षिस म्हणून देवू केली आहे त्यांच्या देशसेवे बरोबरच या दातृत्वाची परिसरात एकच चर्चा सुरू आहे.


देशाबरोबर गाववरही प्रेम
गेले अनेक वर्षे देशसेवा बजावत भारतमातेवर जीवाची बाजी लावून अखंड देशसेवा बाजवली पण देशाबरोबरच आपल्या जन्मभुमीवर देखील तेवढेच प्रेम असणारे माजी सैनिक चंद्रकांत कांबळे यांची गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठीची धडपड इतरांना मार्गदर्शक ठरणार आहे.

Related Stories

भुदरगड तालुक्यात आणखी दोघांना कोरोना

Archana Banage

हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी सोनाली पाटील

Abhijeet Khandekar

भोगावती येथे स्वाभिमानीचे चक्का जाम आंदोलन

Abhijeet Khandekar

धामोड कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कातील २९ जण निगेटिव्ह

Archana Banage

आरोग्यनोंदींच्या डिजिटायझेशनसाठी केंद्राचे नवीन मिशन

Abhijeet Khandekar

नऊ लाख पोटांना ‘शिवभोजन’चा आधार

Archana Banage