Tarun Bharat

ग्रामपंचायत सदस्या बनल्या पोलीस

प्रतिनिधी / सातारा :

राजकारणात येऊन स्वत:चे अस्तित्व निर्माण करुन निवडून येण्याकरीता अनेकजण वर्षानुवर्ष प्रयत्न करीत असतात. एकदा ते पद मिळविल्यावर आपण लहानपणापासुन बघितलेल्या स्वप्नांचा ही विसर पडतो. पण संगममाहुलीच्या ग्रामपंचायत सदस्या वनिता सोपान कोळपे यांनी राजकारणात असुनही राजकारण आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पेलत पोलीस बनण्याचा मान पटकाविला आहे.

पोलीस म्हणून त्यांची केवळ निवडच झाली नाही तर ओबीसी प्रवर्गात प्रथम येण्याचा मानही त्यांनी पटकाविला आहे. लहानपणापासुनच त्यांना पोलीस भरतीत जाऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. पण घरची परिस्थिती आणि त्यातच महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांचे विवाह झाले. त्यामुळे प्रारंभी त्यांना त्यांच्या स्वप्नांकडे वळता आले नाही. त्यातच त्यांचे पती सोपान कोळपे यांना राजकारणात अधिक रस असल्याने आणि महिला आरक्षण असल्याने त्यांनी आपल्या पत्नी वनिता कोळपे यांना राजकारणात उतरविले. पहिल्यांदा त्या अपयशी झाल्या, पण मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या आणि ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडूनही आल्या. यादम्यान त्यांनी राजकारण आणि कुटुंबाची जवाबदारी सांभाळत आपण ही आपले स्वप्न पूर्ण करावे अशी इच्छा उरी बाळगली आणि त्या अनुषंगाने तयारी सुरू केली.

वनिता या मुळच्या लिंबच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचा सांभाळ त्यांच्या आज्जी आजोबांनी केला. त्यामुळे त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण लोणंद येथील वाघोशी येथे झाले. आणि त्याचा विवाह ही मामांनीच करून दिला. विवाहानंतर दोन मुले झाल्यावर सन् 2016 साली त्यांनी 12 वीची परीक्षा दिली. 2017 पासुन पोलीस भरतीचा अभ्यास सुरू केला. 2019 ला भरतीसाठी अर्ज भरलेला आणि कोरोनामुळे परिक्षेचा निकाल लांबणीवर पडल्याने सन् 2021 ला परीक्षेचा निकाल लागला.

वेळ आपणहून काढावयाचा असतो

कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना आपण ही आपले लहानपणापासुनचे स्वप्न पूर्ण करावयाचे ठरविले. याकरीता वेळ हा आपण स्वत:हून काढावयाचा आहे, त्याअनुषंगाने त्यांनी पोलीस भरतीचा सराव सुरू केला. कारण त्यांचा मोठ्ठा मुलगा 7 वी तर मुलगी इयत्ता 7 वी ला आहे. त्यामुळे मुलांकडे ही लक्ष देत त्यांनी या परिक्षेची तयारी सुरू केली. या भरतीकरीता फिजिकल ही तितकाच महत्वाचा आहे, फिजिकलची तयारी करताना त्यांची मुलगी ही त्यांच्यासोबत पळत असे.

पतीची मोलाची साथ

वनिता या सध्या जरी ग्रामपंचायत सदस्या म्हणून कार्यरत जरी असल्या तरी त्यांना पोलीस भरती होण्याकरीता त्यांचे पती सोपान कोळपे यांनी त्यांना मुख्यत: प्रेरित केले. स्वत:चे लहान पणापासुनचे स्वप्न तू पूर्ण करशीलच असा विश्वास दाखविला. मुले जरी लहान असली तरी तु आपल्या अभ्यासाकडे आणि सरावाकडे अधिक लक्ष दे असे सांगितले.

जिद्द व चिकाटी महत्वाची

वनिता यांना यापुर्वीही परिवहन मंडळाच्या विभागात सन् 2014 साली निवड झाली होती. पण त्यांचे पोलीस भरती होण्याचे स्वप्न होते. याकरीता त्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन पेले. इतकेच नाही तर नवी मुंबई पोलिस शिपाई व सातारा पोलिस शिपाईत त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात त्या दोन्ही पैकी एका पदावर त्या रूजु होणार आहेत.

पहिल्याच प्रयत्नात त्यांना हे यश मिळाले आहे, त्यामुळे त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावत नव्हता, उशिरा का होईना आपण आपले स्वप्न पूर्ण केले यात त्यांना मोठ्ठे समाधान मिळाले आहे. इतकेच नाही तर ओबीसी प्रवर्गात अव्वल येण्याचा माण मिळाल्यामुळे कोळपे कुटुंबीयांबरोबर संगममाहुलीचे नाव ही उंचाविले आहे.

Related Stories

केंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षाचा दरीत कोसळून गंभीर

Patil_p

‘विधान परिषदे’चा फैसला ऑक्टोबरमध्ये

Archana Banage

कोरोना संकटामुळे यावर्षीचा विजय दिवस समारोह रद्द

Patil_p

पोलीस, होमगार्डला मारहाण केल्याप्रकरणी चौघे ताब्यात

Patil_p

पुसेसावळीत बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

datta jadhav

कोरोनामुक्त रुग्णांचा जिल्हय़ाला दिलासा

Patil_p