आर आर पाटील स्मृतींना अभिवादन करणार
प्रतिनिधी / सांगली
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रविवार, दि. 16 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता स्वर्गीय आर. आर. (आबा ) पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पंचायत समिती कवठेमहांकाळ येथील अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारत पाहणी व लोकार्पण तसेच पंचायत समिती पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा, स्थळ – पंचायत समिती कवठेमहांकाळ. सकाळी 11.30 वाजता कवठेमहांकाळ येथून अंजनी ता. तासगावकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता स्वर्गीय आर. आर. (आबा) पाटील यांच्या जयंती निमित्त समाधी दर्शन व त्यांच्या घरी सदिच्छा भेट, स्थळ – अंजनी. दुपारी 12.30 वाजता अंजनी येथून मोटारीने कागल, कोल्हापूरकडे प्रयाण.

