Tarun Bharat

ग्रामसेवक संवर्गाबद्द्ल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गगनबावडा येथे काम बंद आंदोलन

Advertisements

असळज / प्रतिनिधी

औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या सरपंच परिषदेमध्ये आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवक संवर्गाबाद्द्ल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गगनबावडा तालुक्यामध्ये ग्रामसेवक संघटना डी.एन.ई.१३६ या संघटनेकडून एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले. या बाबतचे निवेदन पंचायत समिती गगनबावडा येथे गट विकास अधिकारी एम. परीट यांना देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष सुभाष भोसले म्हणाले की,वास्तविक पाहता राज्यातील ग्रामसेवक संवर्ग हा शासन व्यवस्थेमध्ये गावपातळीवर काम करणारा शेवटचा घटक असून कामकाज करताना त्यांना जनमाणसाशी संपर्क व समन्वय ठेवून अत्यंत सचोटीने व पारदर्शक पद्धतीने असंख्य अडचणीवर मात करून काम करणारा घटक आहे. तरीही सरपंच परिषदेमध्ये आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवक संवर्गाबाद्द्ल केलेल्या वक्तव्या हे निंदनीय असुन ग्रामसेवक संघटना याचा निषेध करत आहे. यावेळी संघटनेच्या उपाध्यक्ष सरिता पाटील,सचिव भिमराव गुरव अमित पाटील,प्रकाश पोवार,प्रसाद झोरे व ग्रामसेवक उपस्थित होते.

Related Stories

लग्नाच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करणारी टोळी गजाआड

Abhijeet Khandekar

Kolhapur : अधिकाऱ्यांना अरेरावी करत असाल तर ते बांधकाम पाडणारच!

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : संसर्गित डॉक्टरांसाठी ‘स्पेशल’, कर्मचाऱयांसाठी ‘जनरल’ वॉर्ड

Archana Banage

छत्रपती संभाजीराजे यांना पोलंड देशाचा बेणे मेरितो सन्मान प्रदान

Archana Banage

उद्योजक राजेंद्र कवडे यांचे निधन

Archana Banage

चालू ट्रॅक्टर मधून पडल्याने एकाचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!