Tarun Bharat

ग्रामस्थांनी गावात न घेतल्याने युवकावर रानात टेम्पो उभा करत राहण्याची वेळ

प्रतिनिधी / दापोली

लॉकडाऊनच्या काळात दापोली तालुक्यात दुसऱ्या तालुक्यातून गावात आलेला असल्यामुळे ग्रामस्थांनी गावात राहण्यास आक्षेप घेतल्याने तालुक्यातील केळशी गावातील एका युवकावर जंगलामध्ये टेम्पोमध्ये राहण्याची वेळ आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की दापोली तालुक्यातील केळशी कुंभारवाडा येथील साहिल तळदेवकर हा युवक जिल्ह्यातील खेड येथे नोकरीकरिता असतो त्याचे कुटुंब केळशी कुंभारवाडा येथे राहते. लॉकडाउनच्या काळात हा युवक खेड येथून आपल्या गावी केळशी येथे आला येथे आल्यावर त्याच्या घरी राहण्यावर वाडीतील लोकांनी आक्षेप घेतला. यानंतर वाडीची बैठक बसली बैठकीमध्ये या युवकाच्या भावाला जर तुमच्या घरात वेगळे संडास बाथरूम वापरण्याकरिता असेल तरच याला वाडी ठेवा असा निर्णय सांगण्यात आला. शिवाय हा निर्णय वाडीचा नसून गावचा असल्याचे देखील सांगण्यात आले. नाईलाजाने या युवकाला वाडीतून बाहेर पडावे लागले. मात्र त्यांचे गावात अन्य घर नसल्याने त्याला गावातील एका जंगलात टेम्पो मध्ये राहण्याची वेळ आली. येथे त्याला दररोज जेवणासाठी डबा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येते. मात्र अन्य कोणतीही सुविधा या जंगलामध्ये नाहीत तेथे साधा लाईट देखील नाही रात्री मच्छर फोडून काढतात असे या युवकाने सांगितले.

याबाबत केळशी कुंभारवाडा वाडीअध्यक्ष संतोष खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थिती मान्य केली मात्र सदर युवक सध्या कुठे आहे. याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले. गावच्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार आपण वाडीमध्ये हा निर्णय घेतल्याचे तरुण भारतशी बोलताना सांगितले. मात्र आपण सदर युवकाला जंगलात राहण्याचा सल्ला दिलेला नाही. असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले मात्र या घटनेमुळे तालुक्यातील माणुसकी आता हळूहळू लोप पावत चालली असल्याचे समोर आले आहे.

Related Stories

सिंधुदुर्गचा ‘जीडीपी’ वाढण्यात जिल्हा बँकेचा मोठा वाटा

NIKHIL_N

धरणात बुडालेल्या सुजयच्या आठवणींने कुत्र्याने सोडले प्राण!

Patil_p

Ratnagiri : सिलेंडरच्या स्फोटात दोन महिलांचा मृत्यू, शेट्येनगरातील घटना

Archana Banage

45 वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी आज कोविशिल्डचा दुसरा डोस

Patil_p

दुचाकीस्वार दरीत कोसळलाय…

NIKHIL_N

२४ तास उलटूनही मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प!

Archana Banage