Tarun Bharat

ग्रामीण पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱया 5 जणांवर गुन्हा

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यात लॉकडाऊन करण्यात आलेला असतानाही विनाकारण फिरणाऱयांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आह़े रत्नागिरी ग्रामीण पोलिंसाकडून कोतवडे व काळबादेवी येथे विनाकरण फिरणाऱया 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

संदेश तुकाराम मांडवकर (42), राकेश कृष्णा मांडवकर (30, ऱा धामणेवाडी कोतवडे) व महेश मारूती भोळे, दिनेश विलास शिवलकर, कुणाल रमाकांत मयेकर (ऱा काळबादेवी रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत़ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिह्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमिवर 8 जुलै पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आह़े याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध ठिकाणी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आह़े

कोतवडे बाजारपेठ येथे संदेश व राकेश मांडवकर हे विनाकरण दुचाकीवरून फिरताना पोलिसांच्या पथकाला आढळून आल़े त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता ते कोणतेही समाधानकारक उत्तर देवू शकलेले नाह़ी तसेच ते विनामास्क लावून देखील फिरताना दिसून आले होत़े या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांकडून ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

तसेच काळाबादेवी येथे महेश भोळे, संदेश शिवलकर व कुणाल मयेकर हे पोलिसांना विनाकारण फिरताना आढळून आल़े त्यांच्याकडे देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आल़ी मात्र तिघेही कोणतेही समाधानकारक उत्तर पोलिसांना देवू शकले नाह़ी याप्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

Related Stories

सात दिवसांचे क्वारंटाईन नकोच!

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन कायम

Abhijeet Shinde

बांद्यात तपासणी नाक्यावर 40 हजाराची दारू जप्त

NIKHIL_N

टिळक स्मारकाच्या दूर्दशेबाबत जनआंदोलन उभारणार!

Patil_p

खेड रेल्वे स्थानकानजीक तीन कावळे मृतावस्थेत

Patil_p

ऍपेक्स’ची डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल मान्यता रद्द

Patil_p
error: Content is protected !!