Tarun Bharat

ग्रामीण भागातील पोलीस पाटील, कोतवाल विमासुरक्षा व सुरक्षा किट पासून वंचित

Advertisements

कसबा बीड/ प्रतिनिधी.

आज कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाने सर्वच क्षेत्रावर जबाबदारीचे ओझे ठेवलेले आहे. गावामध्ये लोकांना संसर्गजन्य आजार होऊ नये म्हणून पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल, आरोग्य सेवक अतिशय चांगल्या पद्धतीने खबरदारी घेत आहेत. आज शासनाने ग्रामपंचायतीतील कॉम्प्युटर ऑपरेटर, आदींसाठी विमा योजना दिल्या आहेत,हे कौतुकास्पद आहे. मात्र ग्रामीण भागातील सर्वात महत्त्वाचे असणारे पोलीस पाटील हे विमा सुरक्षा व आरोग्य किट पासून वंचित आहेत.

पोलीस पाटील हे पद ग्रामीण भागामध्ये महत्त्वाचा कणा आहे. गावामध्ये छोट्या गोष्टीपासून मोठ्या घडामोडी पर्यंत कोणतीही घटना घडली, तर त्यासाठी पोलीस पाटील हा उत्तम पर्याय असतो. शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणत्‍याही नोंदी करावयाच्या असतील, तर तलाठी साहेबांच्या अगोदर कोतवाल हा मुख्य घटक असतो. शासकीय कामांमध्ये पोलीस पाटील, महसूलमध्ये कोतवाल हा महत्वाचा असणारा घटक कोराना रोगाच्या कालावधीमध्ये विमासुरक्षा, आरोग्य किट आधी बाबींपासून वंचित राहिला आहे. या प्रश्नावर शासनाने निर्णय घेणे अपेक्षित आहे.

Related Stories

मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपले

Abhijeet Shinde

सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र उभारणीच्या जागेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

Abhijeet Shinde

अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील यांच्या कार्यालय व निवासस्थानी दुसऱ्या दिवशीही आयकरची तपासणी

Abhijeet Shinde

मनी लॉड्रिंग प्रकरण : अनिल देशमुखांकडून गंभीर आरोप

Abhijeet Shinde

राधानगरी तालुक्यात साकारतोय ऊस उत्पादन वाढीचा प्रयोग

Abhijeet Shinde

कर्नाटकातून विक्रीसाठी आणलेल्या सव्वापाच लाखाचा रेशनचा तांदूळ जप्त, चालकास अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!