Tarun Bharat

ग्रामीण भागातील बससेवा सुरू करा

Advertisements

विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलही सुरू करण्याची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र, अजूनही ग्रामीण भागामध्ये बसेस सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. याचबरोबर हॉस्टेलही सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. तेव्हा तातडीने या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

कोरोनामुळे मागीलवषी महाविद्यालये तसेच शाळा बरेच महिने बंद ठेवण्यात आल्या होत्या. 2021 सालामध्ये ऑगस्टपासून बहुसंख्य महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थी बेळगावला येत आहेत. मात्र, बऱयाच गावांना बसेस सुरू करण्यात आल्या नाहीत. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. महाविद्यालये सुरू झाली असून सरकारने अजूनही शिष्यवृत्ती दिली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी आर्थिक समस्येला तोंड देत आहेत.

परजिल्हय़ातून तसेच इतर राज्यांतून काही विद्यार्थी बेळगावला शिक्षण घेत आहेत. त्यांना हॉस्टेलची नितांत गरज आहे. मात्र, हॉस्टेलच सुरू नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा हॉस्टेलही सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात
आले. यावेळी किरण दुकानदार, प्रतीक माळी, शुभम वाळके, अश्विन हुमनाबादीमठ, कार्तिक शिग्गीहळ्ळी, स्नेहा मलाहळ्ळी, संज्योता जोगी यांच्यासह विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

शिवरायांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने जीवनात वाटचाल करावी

Amit Kulkarni

…आणि त्यांच्या डोळय़ातून अश्रू वाहू लागले

Patil_p

महाराष्ट्रातून येणाऱयांसाठीच संस्थात्मक क्वारंटाईन

Patil_p

खानापूर-पारिश्वाड रस्ता झाला सुसाट

Amit Kulkarni

हिंडलगा पंपिंग स्टेशनचा विकास आवश्यक

Amit Kulkarni

काकती सिद्धेश्वर मंदिर परिसरातदेवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन

Amit Kulkarni
error: Content is protected !!