Tarun Bharat

ग्रामीण भागातील संस्था समाजप्रबोधनाचे कार्य करतात

प्रसिद्ध नाईक यांचे उद्गार

वार्ताहर /दाभाळ

ग्रामीण भागातील सामाजिक संस्था खऱया अर्थाने समाजप्रबोधनाचे कार्य करतात. एखादी संस्था सुरु करणे जेवढे सोपे असते तेवढेच ती सातत्याने कार्यरत ठेवणे कठीण असते. सदस्यांचे समर्पित भावनेने केलेले कार्य आणि संघटीतपणा यातूनच संस्था दीर्घकाळ टिकते, असे प्रतिपादन मुरगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रसिद्ध नाईक यांनी केले.

काझरवाडा बेतोडा येथील श्री सरस्वती क्रीडा आणि सांस्कृतिक संघाचा विसावा वर्धापनदिन सोहळा व वार्षिक स्नेह संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर कला अकादमीचे प्रा. शैलेश गावकर, सरपंच विशांत गावकर, पंचसदस्य मंदा मंगलदास गावडे, संघाचे अध्यक्ष दिनेश गावकर, सचिव सुशांत गावडे व गौरवमूर्ती दिप्ती सतरकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. सरस्वती संघ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याबद्दल प्रसिद्ध नाईक यांनी गौरवोद्गार काढले. शैलेश गावकर म्हणाले, अशा संस्थांमुळेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ व प्रोत्साहन मिळते. ग्रामीण भागातील कला गुणांना वाव देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सरस्वती संघासारख्या संस्था करीत आहेत, ही विशेष नेंद घेण्याची गोष्ट आहे. सरस्वती संघाने कला व क्रीडा क्षेत्रापुरती आपले कार्य मर्यादित ठेवले नसून सामाजिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे, असे सरपंच विशांत गावकर म्हणाले. मंदा गावडे यांचेही यावेळी भाषण झाले.

सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिप्ती सतरकर यांचा संघातर्फे गौरव करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांना पाहुण्यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. दिनेश गावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव सुशांत गावडे यांनी अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती गावडे यांनी तर विपुल सतरकर यांनी आभार मानले. संतोष सतरकर यांनी पारितोषिक विजेत्यांची नामावली सादर केली. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

Related Stories

वाहतूक नियम तोडणाऱया 25 हजार वाहनचालकांना दंड

Amit Kulkarni

एकतरी हिंदू राष्ट्र असण्याची गरज

Amit Kulkarni

गोव्याचे भीष्म पितामह न्यायवैधक डॉ. उसगावकार कालवश

Amit Kulkarni

धारबांदोडय़ाच्या विकासासाठी शैक्षणिक प्रकल्प

Amit Kulkarni

काँग्रेस स्वतःच्या सदस्यांची तरी युती घडवू शकेल ?

Amit Kulkarni

फोंडा येथील केशव देव समितीतर्फे 2 एप्रिलपासून ‘श्री राम कथा’

Amit Kulkarni