Tarun Bharat

ग्रामीण भागातील सरकारी शाळांना ग्रीनबोर्ड

Advertisements

मदतीबद्दल शाळांनी मानले आभार

प्रतिनिधी /बेळगाव

प्राथमिक शिक्षण हा समाजाचा पाया आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सुसज्ज झाल्या तर भावी पिढी घडू शकते. हाच उद्देश ठेवून भाजपतर्फे ग्रीनबोर्ड हा उपक्रम राबविण्यात आला आहे. गरज ओळखून अनेक प्राथमिक शाळांमध्ये याचे वितरण करण्यात आले.

सरकारी शाळांमध्ये भाजपा बेळगाव मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. मराठी शाळा निलजी, बेनकनहळ्ळी येथील मराठी शाळा, कुकडोळी येथील कन्नड शाळांना ग्रीनबोर्डचे वितरण करण्यात आले आहे. सुमारे 60 शाळांना हे फलक देण्यात येणार असून त्यासाठी सर्वतोपरी काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

4*10 आकाराचे हे फलक आहेत. प्राथमिक शाळांचा विकास साधल्यासच देशाचा विकास होईल, हा हेतू मनात बाळगून ग्रीनबोर्ड उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी वर्गणी, देणगीदारांकडून साहाय्य घेऊन हा उपक्रम राबविला आहे. विधानपरिषद सदस्य साबण्णा तळवार यांनी 81 बोर्ड दिले असून 155 बोर्ड विधानपरिषद सदस्य अरुण शहापूर यांनी दिले आहेत तर 50 बोर्ड भाजपा मंडळ संघटनेकडून देण्यात आले आहेत. सुमारे 400 बोर्ड देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी बेनकनहळ्ळी येथील शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष परशराम पिसाळे, डॉ. राजू पाटील, अरुण कोलकार, गणेश सुतार, परशराम पाटील, मदन पाटील, मल्लाप्पा पाटील, विजय देसूरकर, बुधाजी पाटील, मुख्याध्यापक बंकापुरे, ईश्वर पाटील, एस. के. बाळेकुंद्री, प्रदीप पाटील व इतर उपस्थित होते.

Related Stories

प्लास्टिक बंदीसाठी लवकरच कृती आराखडा

Amit Kulkarni

प्लास्टिकविरोधी कारवाई काटेकोर करा

Omkar B

मोबाईल विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद

Patil_p

बुरूड गल्लीत शॉर्टसर्किटने तीन घरांना आग

Amit Kulkarni

आपही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार

Amit Kulkarni

बिबटय़ाचा दुसऱया दिवशीही शोध सुरू

Patil_p
error: Content is protected !!