Tarun Bharat

ग्रामीण भागात इंटरनेट सेवा देण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा

Advertisements

भारतनेट योजनेअंतर्गत कंपन्या काम करणार ः 40 कंपन्या मैदानात

मुंबई 

 देशातील ग्रामीण भागात इंटरनेट पोहोचविण्यासाठी जवळपास 40 दिग्गज कंपन्या मैदानात उतरल्या आहेत. परंतु यामध्ये अंतिम निर्णय हा सरकारचा राहणार आहे. सरकारच्या ‘भारतनेट’ योजनेअंतर्गत काम करण्यासाठी सदरच्या कंपन्यांनी तयारी दर्शवली असल्याची माहिती आहे. सदरच्या योजनेच्या माध्यमातून 3.61 लाख गावामध्ये इंटरनेट पोहाचविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

भारतनेटच्या पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने 1 लाख ग्रामपंचायती जोडल्या होत्या.  कोणत्याही खासगी कंपनीची यामध्ये मदत घेतली नव्हती. जास्तीत जास्त कंपन्या पब्लिक पार्टनरशिपच्या स्वरुपात काम करण्यास तयार होत्या. सध्या मात्र अशी परिस्थिती नसल्याचे पहावयास मिळत आहे.

प्रमुख कंपन्या

सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून ज्या प्रमुख कंपन्या दावेदार होत आहेत, त्यामध्ये रिलायन्स इन्फ्राटेल, एसटीएल, सिस्को, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि हय़ूजेश कम्युनिकेशन या कंपन्यांचा समावेश आहे. या योजनेत खासगी कंपन्यांनी अधिकची पसंती दर्शवली असल्याची माहिती आहे.

Related Stories

जिन्यावरून पडल्याने लालूप्रसाद जखमी

Patil_p

खळबळजनक : मुंबईत बारावी बोर्डाचा पेपर फुटला

Sumit Tambekar

गोव्याच्या राज्यपालांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Sumit Tambekar

कोरोना रोखण्यासाठी आवश्यक पावले उचला!

Amit Kulkarni

गावात 400 हून अधिक जुळी मुलं

Patil_p

बिहार निवडणूक : महाआघाडीचे घोषणापत्र जाहीर

datta jadhav
error: Content is protected !!