Tarun Bharat

ग्रामीण भागात किल्ले बनविण्याची लगबग

किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात बालचमू मग्न : छायाचित्रे पाहून हुबेहूब प्रतिकृती बनविण्यासाठी धडपड

आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी

दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणात ग्रामीण भागात किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्यात येतात. यंदाही तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये बालचमू किल्ले बनविण्यात दंग असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कोरोनामुळे सध्या शाळांना सुटी असल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासूनच बालचमू किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारू लागले आहेत.

शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची माहिती शाळेतून मिळते. या माहितीचा आधार घेऊन काही मुले किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवत आहेत. तसेच टीव्हीवरील ऐतिहासिक मालिका, इंटरनेट व फोनद्वारे गडकिल्ल्यांची माहिती व छायाचित्रे पाहून किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्यात येऊ लागल्या आहेत.

बालचमूंचा आनंद द्विगुणीत

गेल्या पंधरा दिवसांपासूनच किल्ले साकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. माती, दगड, गोळे, प्लास्टर, सिमेंट, रंग आदी साहित्याचा उपयोग करून किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती कशा बनविता येतील? यासाठी बालचमू धडपडताना दिसत आहेत. किल्ले बनविताना या बालकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

शाळांना सुटी असल्यामुळे किल्ला बनविण्यासाठी बालकांना मुभा

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे स्मरण लहानपणापासूनच व्हावे, यासाठी दिवाळीच्यावेळी लहान मुलांना किल्ल्याच्या प्रतिकृती बांधण्यास शिकविण्याची प्रथा सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास तरुण पिढीला कळावा, त्यांचे आचारविचार लहानपणापासूनच आचरणात आणावेत, हाही या मागील उद्देश आहे. दरवषी दिवाळीच्या आधी शनिवारी व रविवारच्या दिवशी बालचमू किल्ला बनवत असतात. यंदा मात्र कोरोना महामारीमुळे शाळांना सुटी असल्यामुळे किल्ला बनविण्यासाठी बालकांना मुभा मिळाली आहे.

किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्याची ही परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. अलीकडे किल्ले बनविण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात येऊ लागला आहे. मोबाईलद्वारे अगदी सहजपणे बालकांनाही किल्ल्यांच्या प्रतिकृती किल्ले पाहून त्या पद्धतीने किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्यासाठी सोयीस्कर ठरत आहेत. शहरासह ग्रामीण भागात किल्ले बनविण्यात येत असून शहराच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये अधिक प्रमाणात किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात येऊ लागल्या आहेत. किल्ल्यासाठी लागणारी माती, दगड व इतर साहित्य अगदी सहजपणे ग्रामीण भागात उपलब्ध होते.

किल्ल्यांमध्ये आसनावर आरुढ असलेले छत्रपती शिवाजी महाराज, किल्ल्यावर रक्षण करणारे त्यांचे मावळे अशा मूर्ती ठेवण्यात येतात. तोफा व किल्ल्यांचा सुरक्षित भाग, प्रवेशद्वार, किल्ल्यात असणारी झाडेझुडपे, विहिरी, भवानी मातेचे मंदिर अशा प्रतिकृती किल्ल्यात दाखविण्याचा ही बालके प्रयत्न करताना दिसत आहेत. मातीत हात रंगवून किल्ला बनविताना बालकांच्या चेहऱयावर एक वेगळाच आनंद दिसून येतो आहे. अनेकदा ही बालके किल्ला बनविण्यात इतकी मग्न असतात की खाण्या-पिण्याचा त्यांना विसर पडलेला असतो.

सिंधुदुर्ग, शिवनेरी, प्रतापगड, रायगड, सज्जनगड, सिंहगड, तोरणा गड तसेच बेळगाव तालुक्मयातील राजहंसगड अशा प्रतिकृती साकारण्यात येत आहेत. ऐतिहासिक किल्ले हे राजे-महाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. इतिहासकालीन पराक्रम आणि त्या काळातील संघर्ष यांचे प्रतीक हे गडकिल्ले आहेत. मातीचे किल्ले आणि दिवाळी सण हे अतूट नाते बालकांसाठी बनलेले आहे.

बालकांना व तरुणांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे

सध्याच्या आधुनिक युगात मुलांना टीव्ही, मोबाईल याचे अधिक वेड लागल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत लहान बालके जर गडकिल्ले बनविण्यासाठी प्रयत्न करत असतील तर साहजिकच त्यांना इतिहास तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अधिक आवड निर्माण होईल, यासाठी असे किल्ले बनविणाऱया बालकांना व तरुणांना सर्व स्तरातून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.

किल्ल्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून ही बालके धडपडताना दिसत आहेत. या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी गावागावातील विविध संघ-संस्था व दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यानांचे आयोजनही गावातील प्रमुख मंडळींनी करून गावागावांमध्ये शिवरायांचा जागर होण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.

कार्यक्रम साधेपणाने करण्याचा बालकांचा निर्णय

किल्ल्यांच्या प्रतिकृती जवळपास पूर्णत्वास आल्या असून दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या किल्ल्यांचा उद्घाटन सोहळा करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळय़ासाठी लहान बालके, गावातील काही प्रमुख मंडळींना बोलवितात. तसेच पोवाडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा आदींचे आयोजनही करण्यात येते. यंदा कोरोना असल्यामुळे हे सर्व कार्यक्रम अगदी साधेपणाने करण्याचाही काही बालकांनी निर्णय घेतला आहे.

Related Stories

रेल्वे स्थानकाचा चेहरा आता बदलणार

mithun mane

मंगळवारीही बाजारपेठ फुलली

Patil_p

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 17 रोजी बेळगावात

Patil_p

बुरूड गल्लीत शॉर्टसर्किटने तीन घरांना आग

Amit Kulkarni

जिल्हय़ात 420 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Amit Kulkarni

खानापूर बाजारात दिवाळीनिमित्त खरेदीला उधाण

Amit Kulkarni