Tarun Bharat

ग्राम पंचायतींवर म. ए. समितीचे वर्चस्व राखा

Advertisements

युवा समितीच्या बैठकीत निर्णय

प्रतिनिधी/ बेळगाव

मराठी भाषा, अस्मिता व संस्कृती टिकविण्यासाठी म. ए. समितीशिवाय सीमाभागात पर्याय नाही. त्यामुळे येत्या ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये प्रत्येक गावात म. ए. समितीचा भगवा फडकवा व सीमाप्रश्नाला बळकटी द्यावी. या निवडणुकीत समितीचे नि÷ावान कार्यकर्ते व युवकांना संधी द्यावी, असा निर्णय महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

युवा समितीची व्यापक बैठक रविवारी जत्तीमठ येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके होते. प्रारंभी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमितेचे पूजन करण्यात आले. दिल्ली येथे कृषी विधेयकाविरोधात सुरू असणाऱया आंदोलनाला व पुकारण्यात आलेल्या बंदला बैठकीत पाठिंबा देण्यात आला. मराठा समाजाला प्राधिकार स्थापन करून 50 कोटी दिल्यानंतर आक्षेप घेतलेल्या कन्नड संघटनांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, सरचिटणीस श्रीकांत कदम, अभिजित मजुकर, सुरज कुडुचकर, विनायक कावळे, मनोहर हुंदरे, अश्वजित चौधरी, साईनाथ शिरोडकर, मनोहर शहापूरकर, प्रतिक पाटील, वासु सामजी, चंद्रकांत पाटील, किरण मोदगेकर, शांताराम होसुरकर, प्रकाश हेब्बाजी, दीपक हळदणकर यासह युवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फलकांवरील कारवाई विरोधात जिल्हाधिकाऱयांना निवेदन

महानगरपालिकेच्या वतीने दुकानांवरील फलकांसाठी कन्नड सक्ती केली जात आहे. फलकांवर 60 टक्के कन्नड उल्लेख असावा, अशी सक्ती केली जात आहे. शहरातील अनेक दुकानदारांना फलकांवर कन्नडसाठी नोटिसा पाठविल्या जात आहेत. या विरोधात बुधवार दि. 16 रोजी युवा समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली..

Related Stories

सात-बारा उतारा केंद बंद

Amit Kulkarni

डॉक्टर्स डेनिमित्त डॉ.काळे यांचा सत्कार

Omkar B

ईएसआय हॉस्पिटलचे होणार स्थलांतर

Amit Kulkarni

प्रवाशाला रेल्वे पोलीसांनी बाहेर काढले मृत्यूच्या दाढेतून

Patil_p

राष्ट्रीय स्पर्धेत साई तायक्वांदो संघटनेला यश

Amit Kulkarni

मनपा निवडणूक पुन्हा घ्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!