Tarun Bharat

ग्राम पंचायत निवडणुकीत काँग्रेस ताकदीनिशी उतरणार

विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांची माहिती

प्रतिनिधी /पणजी

आगामी ग्राम पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार असून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आगावू घोषित करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी दिली.

पर्वरी येथील मंत्रालयात काँग्रेस पक्ष विधिमंडळ गटाची बैठक होऊन त्यात विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सर्व 40 विधानसभा मतदारसंघातील पंचायतीमध्ये काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी उमेदवार उभे करणार असून (पक्षीय पातळीवर नव्हे) भाजपच्या महागाईला विटलेली जनता यावेळी पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साथ देईल असा दावा लोबो यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष जिंकलेल्या व हरलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या विधानसभा मतदारसंघातील पंचायत क्षेत्रात काँग्रेस पक्ष उमेदवार देणार आहे.

जनतेचे प्रश्न घेऊन लढणार काँग्रेस

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीने जनता हतबल झाली असून जनतेला दिलासा देण्यासाठी सकारने काहीतरी कृती करावी अशी मागणी लोबो यांनी केली. जनतेचे सर्व प्रश्न, समस्या घेवून काँग्रेस पक्ष लढणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

महागाईची झळ गरीब जनतेला बसली असून जनतेत चीड निर्माण झाल्याचे सांगून लोबो म्हणाले की गोवा हे शांतीप्रिय राज्य असून सर्व जाती, धर्मांचे लोक आनंदाने एकत्र रहातात. त्यास कोणी गालबोट लावू नये, असे ते म्हणाले.

Related Stories

कोकण रेल्वेच्या खासगीकरणाला कडाडून विरोध करणार

Patil_p

साळगावात ज्येष्ठ कार्यकर्त्यालाच तिकीट मिळेल

Amit Kulkarni

एका व्हिडियोने फातोर्डा सराव मैदान बनले चकाचक

Amit Kulkarni

समाज कल्याण खत्यातर्फे देण्यात येणाऱया योजनेची रक्कम काही दिवसात मिळणार

Omkar B

माजी सरपंच देवेंद्र नाईक ‘आप’च्या वाटेवर ?

Amit Kulkarni

‘प्रोग्रेसिव्ह प्रंट’च्या कार्यकर्त्यांना अटक

Omkar B