Tarun Bharat

ग्राम पंचायत निवडणुकीत विविध निर्बंध

आचारसंहिता भंग करणाऱयांवर कारवाई होणार

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव जिह्यामध्ये ग्राम पंचायतीच्या दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यासाठी मंगळवार दि. 22 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. तर दुसऱया टप्प्यातील निवडणुका 27 डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्याबरोबरच अर्ज माघार घेणे आणि प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवडणुकीबाबत पाळावयांच्या सूचना केल्या आहेत. कोणत्याही पक्षाच्या आधाराशिवाय स्वतंत्र देण्यात आलेल्या चिन्हाचाच वापर करावा. कायद्याचे उल्लंघन कोणीही करू नये, राजकीय पक्षाचा ध्वज वापरु नये, कोणत्याही मतदारावर दबावतंत्राचा वापर करू नये, कुणीही अशाप्रकारे केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवडणुकीत मतदारांसाठी वाटप करण्यात येणाऱया हॅन्डबिलवर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचे छायाचित्र अथवा राजकीय पक्षाचे चिन्ह वापरण्यास मनाई आहे. प्रचारादरम्यान हॅन्डबिल, कटाआऊट, बॅनर यावर कोणत्याही राजकीय नेत्याचे छायाचित्र असू नये. याचबरोबर पक्षाच्या चिन्हावरही निर्बंध घातले गेले आहेत. कोणतीही जाहीरात प्रसारीत करताना नेत्याचे छायाचित्र व चिन्ह वापरु नये, असे देखील म्हटले आहे.

याबाबत कोणीही नियमांचे उल्लंघन करत असेल तर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देखील त्यांनी अधिकाऱयांना दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पत्रक काढले आहे.

Related Stories

यंदाचा दसरा साधेपणाने साजरा करा

Tousif Mujawar

बळिराजाच्या नुकसानाकडे सरकारचे साफ दुर्लक्ष

Amit Kulkarni

चन्नम्मा विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर

Amit Kulkarni

ईयर एन्डिंगमुळे रेल्वेचे बुकिंग फुल्ल

Amit Kulkarni

कोरोना परिस्थितीः केंद्रीय पथकाने मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची घेतली भेट

Archana Banage

प्रत्येकाने नेत्रदान करणे आवश्यक

Amit Kulkarni